Local Megablock : आज हार्बर आणि मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक, कधी सुरू ? कधी संपणार ? वाचा एका क्लिकवर

| Updated on: May 22, 2022 | 7:04 AM

हार्बर मार्गावर रविवार दि. 22.5.2022 रोजी मेगा ब्लॉक असणार आहे. अशी माहिती रेल्वेकडून पत्रक काढून देण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांना या वेळा पाहून पर्यायी वेळेचा आणि पर्यायी मार्गाच अवलंब करावा लागणार आहे.

Local Megablock : आज हार्बर आणि मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक, कधी सुरू ? कधी संपणार ? वाचा एका क्लिकवर
Local
Image Credit source: twitter
Follow us on

मुंबई : मुंबईची लोकल (Mumbai Local Train) म्हणजे मुंबईकरांची आणि उपनगरातील लोकांची लाईफलाईन आहे. रोज लाखो प्रवासी या लोकलने प्रवास करतात. सर्वसामान्य मुंबईकर, व्यवसायिक, नोकरी करणारे चाकरमानी लोकलनेच आपल्या कामच्या ठिाकणी पोहचतात. ही लोकल अगदी काही मिनिटं जरी बंद झाली तरी चाकरमान्यांचं वेळापत्रक (Local Timetable)  कोलमडत. रेल्वेकडून दुरूस्तीच्या कामासाठी मेगाब्लॉक जाहीर करण्यात आलाय. रविवारी असणाऱ्या मेगाब्लॉकचे (Local Mega block) वेळापत्रकही रेल्वेकडून देण्यात आलंय. हार्बर मार्गावर रविवार दि. 22.5.2022 रोजी मेगा ब्लॉक असणार आहे. अशी माहिती रेल्वेकडून पत्रक काढून देण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांना या वेळा पाहून पर्यायी वेळेचा आणि पर्यायी मार्गाच अवलंब करावा लागणार आहे.

कसा असेल मेगाब्लॉक?

मध्य रेल्वे, मुंबई विभाग रविवार दि. 22.5.2022 रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी आपल्या उपनगरीय विभागांत मेगा ब्लॉक चालवणार आहे. दि. 21.5.2022 रोजी रात्री 11.30 ते पहाटे 4.30 वाजेपर्यंत भायखळा- माटुंगा अप जलद मार्गावर आणि सकाळी 00.40 ते 5.40 पर्यंत भायखळा- माटुंगा दरम्यान डाउन जलद मार्गावर. सकाळी ५.२० वाजता ची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणारी डाउन जलद सेवा भायखळा आणि माटुंगा स्थानकांदरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येऊन आपल्या वेळापत्रकानुसार थांब्यांवर थांबेल आणि गंतव्यस्थानावर 10 मिनिटे उशिराने पोहोचेल.

दि. 21.5.2022 रोजी रात्री 10.58 ते रात्री 11.15 पर्यंत ठाण्याहून सुटणारी अप जलद सेवा माटुंगा आणि भायखळा स्थानकांदरम्यान अप धिम्या मार्गावर वळवली जाईल, या गाड्या नियोजित थांब्यांनुसार थांबतील आणि गंतव्यस्थानावर 10मिनिटे उशिराने पोहोचतील. पनवेल- वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 पर्यंत ठाणे-वाशी/नेरुळ आणि बेलापूर/नेरुळ-खारकोपर सेवा प्रभावित राहणार नाहीत) पनवेल येथून सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

हे सुद्धा वाचा

पनवेल येथून सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत सुटून ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल येथून सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत सुटून ठाण्याकडे जाणाऱ्या ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत खारकोपर आणि बेलापूर/नेरुळ दरम्यानच्या उपनगरीय रेल्वे सेवा वेळापत्रकानुसार धावतील. ब्लॉक कालावधीत ठाणे- वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- वाशी भागात विशेष उपनगरीय गाड्या धावतील. हे मेंटेनन्स मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना विनंती करण्यात येत आहे की, यामुळे होणार्‍या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे, असे पत्रक रेल्वेने काढले आहे.