Lung Rehabilitation Center : कांदिवलीतील आंबेडकर मनपा रुग्णालयात फुप्फुस पुनर्वसन केंद्र कार्यान्वित

शिवडी येथील क्षयरोग उपचार रुग्णालयात 22 डिसेंबर 2021 रोजी मुंबईतील पहिले असे ‘फुप्फुस पुनर्वसन केंद्र’ सुरु करण्यात आले होते. त्यापाठोपाठ आता कांदिवलीत केंद्र सुरु केल्याने रुग्णांची मोठी सोय होणार आहे. या फुप्फुस पुनर्वसन केंद्रासाठी सिप्ला फाऊंडेशन यांनी संयंत्र पुरविण्यासाठी मदत दिली आहे तर क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमातून मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

Lung Rehabilitation Center : कांदिवलीतील आंबेडकर मनपा रुग्णालयात फुप्फुस पुनर्वसन केंद्र कार्यान्वित
कांदिवलीतील आंबेडकर मनपा रुग्णालयात फुप्फुस पुनर्वसन केंद्र कार्यान्वित
| Edited By: | Updated on: Feb 14, 2022 | 2:31 AM

मुंबई : क्षयरुग्णांना आणि श्वसनाशी संबंधित विकारांमधून सावरण्यासाठी इतरही रुग्णांना उपचार पुरविण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कांदिवली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) महानगरपालिका रुग्णालयात ‘फुप्फुस पुनर्वसन केंद्र’ (Lung Rehabilitation Center) सुरु करण्यात आले आहे. यापूर्वी शिवडी येथील क्षयरोग उपचार रुग्णालयात श कार्यान्वित करण्यात आले होते. महानगरपालिकेच्या प्रमुख वैद्यकीय अधीक्षक डॉ. विद्या ठाकूर यांच्या हस्ते कांदिवलीतील ‘फुप्फुस पुनर्वसन केंद्र’ कार्यान्वित करण्यात आले. कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे यावेळी उपस्थिती लावली. मुंबई शहर क्षयरोग अधिकारी डॉ. प्रणिता टिपरे यांच्यासह राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाचे अधिकारी, कर्मचारी तसेच रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते. (Lung Rehabilitation Center in start at Ambedkar Municipal Hospital, Kandivali)

शिवडी क्षयरोग रुग्णालयात पहिले केंद्र सुरु

बृहन्मुंबई महानगरपालिकेचा सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून सर्वंकष व सर्वोत्कृष्ट अशा आरोग्य सुविधा दिल्या जात आहेत. शिवडी येथील क्षयरोग उपचार रुग्णालयात 22 डिसेंबर 2021 रोजी मुंबईतील पहिले असे ‘फुप्फुस पुनर्वसन केंद्र’ सुरु करण्यात आले होते. त्यापाठोपाठ आता कांदिवलीत केंद्र सुरु केल्याने रुग्णांची मोठी सोय होणार आहे. या फुप्फुस पुनर्वसन केंद्रासाठी सिप्ला फाऊंडेशन यांनी संयंत्र पुरविण्यासाठी मदत दिली आहे तर क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमातून मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यात आले आहे. मुंबईकर नागरिकांचे हित लक्षात घेता, उपनगरीय रुग्णालयांमध्ये शक्य तिथे क्षयरुग्णांना उपचारांच्या सुविधा पुरविल्या जातील, असे डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले. डॉ. विद्या ठाकूर यांनी राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम अंतर्गत कार्यरत तसेच कांदिवलीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महानगरपालिका रुग्णालय अंतर्गत कार्यरत वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सदर केंद्र सुरु केल्याबद्दल अभिनंदन केले.

श्वसनाशी संबंधित सर्व विकारांसाठी आवश्यक पुनर्वसन उपचार विनामूल्य होणार

कांदिवलीतील ‘फुप्फुस पुनर्वसन केंद्र’ हे सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत सुरु राहणार आहे. या केंद्राद्वारे श्वसनाशी संबंधित सर्व विकारांसाठी आवश्यक पुनर्वसन उपचार विनामूल्य दिले जाणार आहेत. यामध्ये फॉलो-अपसाठी येणाऱ्या रुग्णांसह क्षयरोगातून बरे झालेले रुग्ण, गंभीर स्वरुपाच्या फुप्फुस आजाराचे रुग्ण, दमा, सूक्ष्म श्वासनलिकेचे रुग्ण, फुप्फुसांना भेगा पडल्याने त्रस्त झालेले रुग्ण, कोविडमधून बरे झालेले रुग्ण अशा विविध प्रकारच्या रुग्णांना फुप्फुस पुनर्वसनाशी संबंधित उपचार घेता येतील. (Lung Rehabilitation Center in start at Ambedkar Municipal Hospital, Kandivali)

इतर बातम्या

Mumbai Drugs Siezed : मुंबई विमानतळावर 60 कोटींचे ड्रग्ज हस्तगत, झिम्बाब्वेहून आलेली महिला अटक

भाजपचा महाराष्ट्राला बदनाम करण्याचा डाव, काँग्रेस पक्ष उत्तर भारतीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे : नाना पटोले