महामोर्चाच्या प्रत्येक प्रश्नाला सडेतोड उत्तर, महाविकास आघाडीकडून व्हिडीओ जारी, पाहा नेमकं काय म्हटलंय?

महाविकास आघाडीकडून महामोर्चाचा व्हिडिओ रिलिज करण्यात आलाय. या व्हिडिओत मोर्चा कशासाठीच्या मथळ्याखाली अनेक उत्तरं स्पष्ट करण्यात आली आहेत.

महामोर्चाच्या प्रत्येक प्रश्नाला सडेतोड उत्तर, महाविकास आघाडीकडून व्हिडीओ जारी, पाहा नेमकं काय म्हटलंय?
| Updated on: Dec 15, 2022 | 10:43 PM

सुमेध साळवे, मुंबई : महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांची आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी अजित पवार यांनी महामोर्चाबद्दल भूमिका मांडली. येत्या 17 डिसेंबरला मुंबईत मोर्चा काढण्यावर महाविकास आघाडी ठाम आहे. महाविकास आघाडीची या मोर्चासाठी पूर्ण तयारी झालीय. विशेष म्हणजे या मोर्चासाठी आता महाविकास आघाडीकडून वातावरण निर्मिती केली जातेय. त्यासाठी महाविकास आघाडीने मोर्चा कशासाठी या मथळ्याखाली अनेक उत्तर स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलायय.

व्हिडीओत काय काय म्हटलंय?

मोर्चा कशासाठी…!

महाराष्ट्र धर्म जागवण्यासाठी…!

संविधान वाचवण्यासाठी…!

मिंधे सरकारला भानावर आणण्यासाठी…!

आमच्या दैवतांचा अपमान करणाऱ्यांना वटणीवर आणण्यासाठी…!

अस्मिता आणि स्वाभिमान जपण्यासाठी…!

छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकराच्या सन्मानासाठी…!

अखंड महाराष्ट्रासाठी…!

युवकांचा रोजगार टिकवण्यासाठी…!

जनतेचा आवाज उठवण्यासाठी…!

हुकुमशाहीशी लढण्यासाठी…!

महाराष्ट्रावरच्या प्रेमासाठी…!

महाराष्ट्र द्रोह्यांच्या विरोधात हल्लाबोल…!