AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lamborghini मध्ये खरंच असतात 9 गिअर, 10 कोटीच्या कारचे सत्य भलतेच…

Lamborghini cars features: कानपुरात  Lamborghini कारचा अपघात झाला होता. त्यानंतर चालकाने या कारला नऊ गिअर असल्याचा दावा केला होता. प्रत्यक्षात मात्र परिस्थिती वेगळी आहे.

Lamborghini मध्ये खरंच असतात 9 गिअर, 10 कोटीच्या कारचे सत्य भलतेच...
Lamborghini
| Updated on: Feb 13, 2026 | 8:16 PM
Share

कानपूरात Lamborghini car ने सहा जणांना चिरडल्याच्या अपघानंतर (Kanpur Lamborghini crash) या कारच्या चालकाने केलेला दावा अखेर दिशाभूल करणारा ठरला आहे. त्यानंतर या केसमध्ये बरेच पाणी पुलाखालून गेले आहे. आरोपी  शिवम मिश्रा याला अटकही झाली आणि जामीनही मिळाला. मात्र Lamborghini car नऊ गिअर असल्याचा दावा चालकाने केला होता. मात्र,खरेच या महागड्या कारला नऊ गिअर असतात का ?

गिअरचा गेम

लॅबॉर्गिनी कार सर्वसाधारणपणे सात गिअर असतात. मात्र ऑटोच्या भाषेत 7 स्पीड ट्रान्समिशन म्हणतात. इटालियन ब्रँडच्या काही कारमध्ये  8 स्पीड ट्रान्समिशन देखील असतात. परंतू 9 गिअरची कोणतीही सिस्टीम आतापर्यंत नाही. अपघाताच्या वेळी कथित आरोपी शिवम मिश्रा जी Lamborghini Revuelto कार चालवत होता त्याच्यातही 8 स्पीड ड्युएल-क्लच ट्रान्समिशन (DCT) गिअरबॉक्सची सोय आहे. गिअरचा गुंता तर सुटला तर महागड्या या कारमध्ये आणखी काय सुविधा असते ते पाहूयात..

इंजिनाची अवस्था

Lamborghini Revuelto ब्रँडच्या पहिल्या HPEV (हाय परफॉर्मन्स इलेक्ट्रिफाईड व्हेईकल ) हायब्रिड सुपर स्पोर्ट कार आहे. यात 6.5 लिटर V12 इंजिनच्या पॉवरसोबत तीन इलेक्ट्रीक मोटर असतात. म्हणजे पॉवर सोबत कोणताही कम्प्रोमाईज नाही. या कारचे इंजिन आणि इलेक्ट्रीक मोटर मिळून एकूण  1015hp ची पॉवर जनरेट करते. ही Revuelto कार 0 ते100 km/h वेग केवळ 2.5 सेंकदात पकडते. आणि याची टॉप स्पीड दर ताशी 350km/h इतका जास्त आहे. इतका वेग असल्याने सपाट हायवे असेल तर ही कार वाहतूक कोंडी नसेल तर मुंबई ते पुणे एका तासात पोहचेल.

कार्बन फायबरचा वापर

Revuelto चे वजन कमी करण्यासाठी कंपनीने यात नव्या जनरेशनच्या कार्बन-फायबर चेसिस वापर केला आहे. यामुळे ही कार आधी पेक्षा 10 टक्के हलकी आणि 25 टक्के मजबूत होते. आता किंमतीचे बोलायचे झाले असेल किंमत 8 कोटी 89 लाख रुपये (एक्स शोरूम) होते. ऑन रोडवर ही किंमतीत याची किंमत 10.5-11 कोटी रुपयांच्या दरम्यान होऊ शकते.

रायडिंग मोड

Revuelto मध्ये अनेक ड्राईव्ह मोड कॉम्बिनेशन असतात. यात Citta (EV-ओन्ली मोड आहे ), यात Strada, Sport आणि Corsa मोड सामील आहे. हायब्रिड सिस्टीमला मॅनेज करण्यासाठी रिचार्ज, हायब्रिड आणि परफॉर्मन्सले मोड दिले आहेत. हायब्रिड सिस्टीमला मॅनेज करण्यासाठी रिचार्ज, हायब्रिड आणि परफॉर्मेंस मोड दिलेले आहेत. यामुळे ड्रायव्हर पॉवर आणि बॅटरी युजला नियंत्रित करु शकतो.

Follow Us
चेहऱ्यावर निखळ आनंद आणि साधे हावभाव...नाना पाटेकरांचा व्हिडीओ...
चेहऱ्यावर निखळ आनंद आणि साधे हावभाव... नाना पाटेकरांचा अखेरचा व्हिडीओ पाहून चाहत्यांचे डोळे पाणावले
नाना पाटेकर यांच्या निधनाने उद्धव ठाकरे भावुक; म्हणाले, 'विश्वासच...
नाना पाटेकर यांच्या निधनाने उद्धव ठाकरे भावुक; म्हणाले, 'विश्वासच बसत नाही की...
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक...
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया, म्हणाले...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या, ‘सिनेसृष्टीतल ही पोकळी भरून निघणार नाही’
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते...
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते; 45 सीपीआर दिला मात्र...  काय घडलं?
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला- सुप्रिया सुळे
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला, मी... सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील...
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्याची भावनिक प्रतिक्रिया
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
Nana Patekar | ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार...
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार, रोहित पवारांची मोठी माहिती
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?