AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rahul Gandhi On Sharad Pawar: ‘शरद पवारांनी विधेयकाला पाठिंबा दिला तर…’, राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय

इंडिया आघाडीतील महत्त्वाचे नेते असलेल्या शरद पवार यांनीच विरोधात भूमिका मांडल्याने राज्यातील काँग्रेस नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. दुसरीकडे, शरद पवार यांनी विधेयकाला पाठिंबा दिला तर इंडिया आघाडीत त्यांचे स्थान काय? याबाबत आता राहुल गांधी यांनीच महत्त्वाचा खुलासा केला आहे. 

Rahul Gandhi On Sharad Pawar: 'शरद पवारांनी विधेयकाला पाठिंबा दिला तर...', राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय
Sharad Pawar
| Updated on: Nov 28, 2026 | 6:48 PM
Share

Rahul Gandhi On Sharad Pawar NCP:  शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने केंद्र सरकारच्या मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. इंडिया आघाडीतील महत्त्वाचे नेते असलेल्या शरद पवार यांनीच विरोधात भूमिका मांडल्याने राज्यातील काँग्रेस नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. दुसरीकडे, शरद पवार यांनी विधेयकाला पाठिंबा दिला तर इंडिया आघाडीत त्यांचे स्थान काय? याबाबत आता राहुल गांधी यांनीच महत्त्वाचा खुलासा केला आहे.

काय म्हणाले राहुल गांधी?

“भारतीय जनता पक्षाला आम्ही मतचोरीवरुन घेरले, त्यानंतर त्यांनी आता डिलिमिटेशनच्या माध्यमातून निवडणुका चोरण्याचा नवा मार्ग शोधला आहे. देशातील 80 टक्के लोकांचा विश्वास आहे की भाजप निवडणुका चोरते. त्यामुळेच या विधेयकाला आमचा विरोध आहे. मात्र शरद पवार यांनी या विधेयकाला पाठिंबा दिला तरी त्यांचे इंडिया आघाडीमधील स्थान बदलणार नाही. त्यांचे इंडिया आघाडीतील स्थान कायम राहणार आहे,” असं राहुल गांधी यांनी स्पष्ट केले आहे.

यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी भारतीय जनता पक्षावर गंभीर आरोप केलेत. “डिलिमेटशनच्या माध्यमातून ते 850 जागांवर त्यांना कुठे रंग भरायचे आहेत ते त्यांच्या मताने भरतील. यामुळे भारतीय जनता पक्षाला मोठा फायदा होणार आहे. असाच त्यांचा प्लॅन आहे. 850 हा लोकशाहीची हत्या करणारा आकडा आहे. हाच आकडा भारतातील लोकशाही संपवणार आहे, डिलिमिटेशनमुळे 2051 पर्यंत मतदारसंघ फ्रीज केले जातील,” असा घणाघात त्यांनी केला.

शरद पवार यांच्या भूमिकेवरुन टीका…!

दरम्यान, “शरद पवार यांनी विधेयकाला पाठिंबा दिल्यानंतर त्यांच्यावर चौफेर टीका होत आहे. शरद पवार, सुप्रिया सुळे बाप-लेकींनी घरात बसून निर्णय घेतला. सत्तेसाठी जगायचे अन् सत्तेसाठी मरायचे हेच शरद पवार यांच्या डोक्यात आहे, असं म्हणत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार टिका केली होती. दुसरीकडे,  या देशद्रोही, महाराष्ट्रद्रोही विधेयकाला पाठिंबा दिला तर महाराष्ट्र माफ करणार नाही,” असं म्हणत संजय राऊत यांनीही शरद पवार यांच्या भूमिकेवरुन टीका केली होती.

Follow Us
'रेजिम चेंज'वरून फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा; संविधान आणि लोकशाहीबाबत
'रेजिम चेंज'वरून फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा; संविधान आणि लोकशाहीबाबत मोठं विधान!
NDA मध्ये यायचं असेल तर अधिकृत पत्र द्या; प्रफुल्ल पटेलांचा पवारांना..
NDA मध्ये यायचं असेल तर अधिकृत पत्र द्या; प्रफुल्ल पटेलांचा पवारांना सूचक संदेश!
सिंधुदुर्ग-मुंबई विमानात अचानक बिघाड! प्रवाशांना 2 वेळा उतरवलं, अखेर..
सिंधुदुर्ग-मुंबई विमानात अचानक बिघाड! प्रवाशांना 2 वेळा उतरवलं, अखेर... प्रवासाचा खोळंबा
सरकारी जमिनीवरील घरांना मिळणार कायदेशीर मालकी हक्क? शासनाचा निर्णय...
सरकारी जमिनीवरील घरांना मिळणार कायदेशीर मालकी हक्क? शासनाचा मोठा निर्णय, लाखो कुटुंबांना दिलासा
शरद पवार तसेच DMKची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार; इंडिया आघाडीची...
INDIA Alliance Meeting : शरद पवार तसेच DMKची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार; इंडिया आघाडीची पुढील वाटचाल काय?
दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये NCB ची धडक कारवाई; अमली पदार्थ सेवन...
दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये NCB ची धडक कारवाई; अमली पदार्थ सेवन केल्याप्रकरणी दोघे ताब्यात
अहिल्यादेवी होळकर कॅन्सर हॉस्पीटलमधून शरद पवार पुन्हा ब्रीच कॅन्डी...
Sharad Pawar Heath Update : अहिल्यादेवी होळकर कॅन्सर हॉस्पीटलमधून शरद पवार पुन्हा ब्रीच कॅन्डी रुग्णालयात
पवारांच्या राष्ट्रवादीवर पुन्हा निशाणा; NCP ने डिलिमिटेशनला पाठिंबा..
राज ठाकरेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर पुन्हा निशाणा; NCP ने डिलिमिटेशनला पाठिंबा देताच जुनी पोस्ट केली शेअर!
शरद पवारांची प्रकृती आता कशी? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची हेल्थ अपडेट
Sharad Pawar : शरद पवारांची प्रकृती आता कशी? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची हेल्थ अपडेट
डीलिमिटेशनमुळे संघराज्य व्यवस्थेला धोका? ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उल्हास...
डीलिमिटेशनमुळे संघराज्य व्यवस्थेला धोका? ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न!