AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पीव्ही सिंधू, शुभमन गिलपासून दीपेंद्र गोयलपर्यंत सगळ्यांच्याच कपाळावर दिसणारी ‘ती चीप’ नक्की आहे तरी काय? किंमत तब्बल…

अनेक सेलिब्रिटी त्यांच्या कपाळावर एक विशेष उपकरण लावलेले दिसतात. ते खरंच काम करते की नाही? हे नक्की काय आहे? याचा काय फायदा आहे? खेळाडूच ते का वापरतात असे प्रश्न तुम्हाला पडलेच असतील चला जाणून घेऊ

पीव्ही सिंधू, शुभमन गिलपासून दीपेंद्र गोयलपर्यंत सगळ्यांच्याच कपाळावर दिसणारी 'ती चीप' नक्की आहे तरी काय? किंमत तब्बल...
| Updated on: Nov 28, 2026 | 6:36 PM
Share

आजकाल फिटनेसशी संबंधित अनेक गॅजेट्स बाजारात आली आहेत. विविध फिटनेस बँड्स आणि स्मार्टवॉचेस हृदयाचे ठोके, झोपेचे चक्र आणि नाडी यांसारख्या गोष्टींवर लक्ष ठेवतात. मात्र, आजकाल कपाळावर लावायचे एक छोटे उपकरण चर्चेत आहे, जे अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटी वापरताना दिसतात. अलीकडेच, पीव्ही सिंधू आणि शुभमन गिल यांसारखे प्रसिद्ध खेळाडूही ते वापरताना दिसले. हे लहान आणि एखाद्या चीपसारखे कपाळाच्या बाजूला लावले जाते. हे नक्की काय आहे? याचा काय फायदा आहे खेळाडू ते का वापरतात असे प्रश्न तुम्हाला पडलेच असतील चला जाणून घेऊ

पीव्ही सिंधू, शुभमन गिल, राज शमानी, गझल अलघ आणि दीपेंद्र गोयल यांच्यासह अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटी त्यांच्या कपाळाजवळ एक छोटे उपकरण लावलेले दिसले आहेत. ‘टेम्पल’ नावाचे हे उपकरण झोमॅटोचे संस्थापक दीपेंद्र गोयल यांच्या टीमने विकसित केले आहे. या उपकरणाची किंमत सुमारे 85,000 रुपये असल्याचे सांगितले जात आहे. हे उपकरण मेंदूतील रक्तप्रवाहावर लक्ष ठेवते, असा दावा केला जात आहे.

हे डिव्हाईस कसे काम करते?

मेंदूतील रक्तप्रवाहाचे निरीक्षण: हे डिव्हाइस मेंदूतील रक्ताभिसरण आणि ऑक्सिजनच्या पातळीवर सतत आणि रिअल-टाइममध्ये लक्ष ठेवते.

आरोग्य आणि मानसिक ताण (Entropy Score): झोप, मानसिक ताण, कॅफिन, व्यायाम आणि ध्यानधारणेचा मेंदूवर होणारा परिणाम मोजण्यासाठी हे डिव्हाइस १ ते २५० दरम्यानचा ‘एन्ट्रॉपी’ (Entropy) नावाचा लाईव्ह स्कोर दाखवते.

लक्ष आणि स्मरणशक्ती: प्रगत सेन्सर्स आणि AI च्या मदतीने हे डिव्हाइस वापरकर्त्याला एकाग्रता (Focus), स्मरणशक्ती आणि थकव्याबद्दल अचूक माहिती देते.

वृद्धत्वाचा अभ्यास (Gravity Ageing): वाढत्या वयानुसार मेंदूतील रक्तप्रवाहात होणारे बदल आणि दीर्घायुष्य (Longevity) समजून घेण्यासाठी या तंत्रज्ञानावर संशोधन सुरू आहे.

टेम्पल डिव्हाइस विशेषतः मेंदूतील रक्तप्रवाहाचा मागोवा घेण्यासाठी तयार केले आहे. ते कपाळाजवळ ठेवले जाते, जिथे सेन्सर्स त्वचेखालील रक्तवाहिन्यांमधून येणारे संकेत वाचतात. या डिव्हाइसमधून निर्माण होणाऱ्या डेटाचे विश्लेषण एका अद्वितीय तंत्रज्ञानाचा वापर करून काढले जाते . असा दावा केला जातो की, यातून अंतर्गत आरोग्य, वृद्धत्व आणि पुनर्प्राप्ती यांबद्दल सखोल माहिती मिळू शकते.

केवळ सेलिब्रिटी वापरतात म्हणून महागडी गॅजेट्स खरेदी करणे आवश्यक नाही. मात्र, जर तुम्हाला 85,000 रुपये सहज परवडत असतील, तर एकदा प्रयत्न करून बघायला हरकत नाही. पण हे लक्षात ठेवा की, याकडे केवळ फिटनेस आणि वेलनेस ट्रॅकिंग गॅजेट म्हणूनच पाहावे, कोणत्याही आजाराचे निदान करणारे वैद्यकीय उपकरण म्हणून नव्हे.

Follow Us
'रेजिम चेंज'वरून फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा; संविधान आणि लोकशाहीबाबत
'रेजिम चेंज'वरून फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा; संविधान आणि लोकशाहीबाबत मोठं विधान!
NDA मध्ये यायचं असेल तर अधिकृत पत्र द्या; प्रफुल्ल पटेलांचा पवारांना..
NDA मध्ये यायचं असेल तर अधिकृत पत्र द्या; प्रफुल्ल पटेलांचा पवारांना सूचक संदेश!
सिंधुदुर्ग-मुंबई विमानात अचानक बिघाड! प्रवाशांना 2 वेळा उतरवलं, अखेर..
सिंधुदुर्ग-मुंबई विमानात अचानक बिघाड! प्रवाशांना 2 वेळा उतरवलं, अखेर... प्रवासाचा खोळंबा
सरकारी जमिनीवरील घरांना मिळणार कायदेशीर मालकी हक्क? शासनाचा निर्णय...
सरकारी जमिनीवरील घरांना मिळणार कायदेशीर मालकी हक्क? शासनाचा मोठा निर्णय, लाखो कुटुंबांना दिलासा
शरद पवार तसेच DMKची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार; इंडिया आघाडीची...
INDIA Alliance Meeting : शरद पवार तसेच DMKची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार; इंडिया आघाडीची पुढील वाटचाल काय?
दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये NCB ची धडक कारवाई; अमली पदार्थ सेवन...
दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये NCB ची धडक कारवाई; अमली पदार्थ सेवन केल्याप्रकरणी दोघे ताब्यात
अहिल्यादेवी होळकर कॅन्सर हॉस्पीटलमधून शरद पवार पुन्हा ब्रीच कॅन्डी...
Sharad Pawar Heath Update : अहिल्यादेवी होळकर कॅन्सर हॉस्पीटलमधून शरद पवार पुन्हा ब्रीच कॅन्डी रुग्णालयात
पवारांच्या राष्ट्रवादीवर पुन्हा निशाणा; NCP ने डिलिमिटेशनला पाठिंबा..
राज ठाकरेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर पुन्हा निशाणा; NCP ने डिलिमिटेशनला पाठिंबा देताच जुनी पोस्ट केली शेअर!
शरद पवारांची प्रकृती आता कशी? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची हेल्थ अपडेट
Sharad Pawar : शरद पवारांची प्रकृती आता कशी? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची हेल्थ अपडेट
डीलिमिटेशनमुळे संघराज्य व्यवस्थेला धोका? ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उल्हास...
डीलिमिटेशनमुळे संघराज्य व्यवस्थेला धोका? ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न!