AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Delimitation Bill: आम्हाला महाविकास आघाडीत ढकलून स्वतः शरद पवार पळून गेले, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा संताप

Chandrakant Khaire Slams Sharad Pawar: शरद पवारांच्या मागे जाऊन आम्ही आमचं नुकसान करून घेतलं, असं म्हणत चंद्रकांत खैरेंनी संताप व्यक्त केला आहे. यामुळे आता याची राजकारणात चर्चा होत आहे.

Delimitation Bill: आम्हाला महाविकास आघाडीत ढकलून स्वतः शरद पवार पळून गेले, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा संताप
Chandrakant Khaire Questions NCP's Role in MVA
| Updated on: Nov 28, 2026 | 7:02 PM
Share

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा महाविकास आघाडीतील जुन्या राजकीय घडामोडींवरून आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांच्या पक्षाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शरद पवारांनी दिलेला पाठिंबा आपल्याला मान्य नसल्याचे सांगतानाच त्यांच्या राजकीय भूमिकेमुळे शिवसेनेचे नुकसान झाल्याचा आरोप खैरे यांनी केला.

शरद पवारांच्या मागे महाविकास आघाडीत जाऊन आम्ही आमचं नुकसान करून घेतलं. त्यांच्या मागे राहून आम्हाला काय फायदा झाला? सत्तेतही राहता आलं नाही आणि त्यांनी आम्हाला धोका दिला, अशा शब्दांत खैरेंनी आपला संताप व्यक्त केला. शरद पवारांच्या राजकीय भूमिकेवर प्रश्न उपस्थित करताना खैरे म्हणाले की, महाविकास आघाडीमध्ये जाण्याबाबत त्यावेळी अनेक नेत्यांनी सावध केले होते. शरद पवार भाजपसोबत जातील आणि तुम्ही मात्र तसेच राहाल, असे अनेकजण सांगत होते. मात्र, त्यांच्या सोबत राहून शिवसेनेला नेमका काय फायदा झाला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

आताची परिस्थिती पाहता शरद पवारांनी आपल्याला धोका दिल्यासारखेच झाले आहे, असेही ते म्हणाले. सुप्रिया सुळे यांची भूमिका देखील स्पष्ट नसून त्यांचे तळ्यात-मळ्यात सुरू असल्याची टीका त्यांनी केली. शरद पवारांच्या राजकीय इतिहासाचा दाखला देत चंद्रकांत खैरे यांनी आणखी गंभीर आरोप केले. ते म्हणाले, वसंतदादांपासून आम्हाला शरद पवारांची हिस्ट्री माहिती आहे. ते बाळासाहेबांचे मित्र होते. त्यांनी आम्हाला एकत्र आणले आणि स्वतःच निघून गेले.

शरद पवार यांच्याबद्दल आदर असल्याचे सांगतानाच त्यांच्या भूमिकेमुळे दुःख झाल्याची भावनाही खैरेंनी व्यक्त केली. मी शरद पवारांना बाळासाहेबांसारखा मानतो. मात्र ते आज निघून गेले याचे आम्हाला दुःख झाले, असे ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसने उघडपणे बंड केल्याचा आरोप करत खैरेंनी आता महाविकास आघाडीत राष्ट्रवादीसोबत राहण्याचा प्रश्नच नसल्याचे स्पष्ट केले. आम्हाला महाविकास आघाडीत ढकलून हे स्वतः पळून गेले. आम्हाला एकत्र आणले आणि तेच निघून गेले, अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

यावेळी बोलताना खैरेंचा संताप अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. आमचं काय राहिलं? आमचं एवढं आयुष्य गेलं. यांच्या मागे आम्ही भरकटून गेलो, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. याचवेळी एकनाथ शिंदे यांच्या गटातील नेत्यांचा संदर्भ देत त्यांनी शिवसेनेच्या राजकीय वाटचालीवरही भाष्य केले. खैरेंच्या या वक्तव्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबतची नाराजी पुन्हा एकदा उघड झाली आहे. महाविकास आघाडीतील राजकीय संबंधांवर नव्याने चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे.

Follow Us
'रेजिम चेंज'वरून फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा; संविधान आणि लोकशाहीबाबत
'रेजिम चेंज'वरून फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा; संविधान आणि लोकशाहीबाबत मोठं विधान!
NDA मध्ये यायचं असेल तर अधिकृत पत्र द्या; प्रफुल्ल पटेलांचा पवारांना..
NDA मध्ये यायचं असेल तर अधिकृत पत्र द्या; प्रफुल्ल पटेलांचा पवारांना सूचक संदेश!
सिंधुदुर्ग-मुंबई विमानात अचानक बिघाड! प्रवाशांना 2 वेळा उतरवलं, अखेर..
सिंधुदुर्ग-मुंबई विमानात अचानक बिघाड! प्रवाशांना 2 वेळा उतरवलं, अखेर... प्रवासाचा खोळंबा
सरकारी जमिनीवरील घरांना मिळणार कायदेशीर मालकी हक्क? शासनाचा निर्णय...
सरकारी जमिनीवरील घरांना मिळणार कायदेशीर मालकी हक्क? शासनाचा मोठा निर्णय, लाखो कुटुंबांना दिलासा
शरद पवार तसेच DMKची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार; इंडिया आघाडीची...
INDIA Alliance Meeting : शरद पवार तसेच DMKची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार; इंडिया आघाडीची पुढील वाटचाल काय?
दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये NCB ची धडक कारवाई; अमली पदार्थ सेवन...
दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये NCB ची धडक कारवाई; अमली पदार्थ सेवन केल्याप्रकरणी दोघे ताब्यात
अहिल्यादेवी होळकर कॅन्सर हॉस्पीटलमधून शरद पवार पुन्हा ब्रीच कॅन्डी...
Sharad Pawar Heath Update : अहिल्यादेवी होळकर कॅन्सर हॉस्पीटलमधून शरद पवार पुन्हा ब्रीच कॅन्डी रुग्णालयात
पवारांच्या राष्ट्रवादीवर पुन्हा निशाणा; NCP ने डिलिमिटेशनला पाठिंबा..
राज ठाकरेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर पुन्हा निशाणा; NCP ने डिलिमिटेशनला पाठिंबा देताच जुनी पोस्ट केली शेअर!
शरद पवारांची प्रकृती आता कशी? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची हेल्थ अपडेट
Sharad Pawar : शरद पवारांची प्रकृती आता कशी? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची हेल्थ अपडेट
डीलिमिटेशनमुळे संघराज्य व्यवस्थेला धोका? ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उल्हास...
डीलिमिटेशनमुळे संघराज्य व्यवस्थेला धोका? ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न!