फक्त ट्रेनिंगला पाठवणं बाकी होतं, MAT कडून 636 PSI ची नियुक्ती स्थगिती

| Updated on: Aug 02, 2019 | 9:03 AM

राज्य पोलीस दलाने कोणतीही भरतीची जाहिरात नसताना आणि महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) मागणी नसतानाही ही भरती केली होती, असा निर्वाळा मॅटने (Maharashtra administrative tribunal) दिलाय. त्यामुळे सर्व प्रक्रियेला सामोरं गेलेल्या या उमेदवारांना मोठा धक्का बसलाय.

फक्त ट्रेनिंगला पाठवणं बाकी होतं, MAT कडून 636 PSI ची नियुक्ती स्थगिती
Maharashtra Police Bharti 2019
Follow us on

मुंबई : महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरण म्हणजेच ‘मॅट’ने (Maharashtra administrative tribunal) 636 पोलीस उपनिरीक्षकांच्या (पीएसआय) भरतीला स्थगिती दिली आहे. राज्य पोलीस दलाने कोणतीही भरतीची जाहिरात नसताना आणि महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) मागणी नसतानाही ही भरती केली होती, असा निर्वाळा मॅटने (Maharashtra administrative tribunal) दिलाय. त्यामुळे सर्व प्रक्रियेला सामोरं गेलेल्या या उमेदवारांना मोठा धक्का बसलाय.

पीएसआयच्या भरतीची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली होती. मैदानी परीक्षा, वैद्यकीय चाचणी यासह सर्व सोपस्कार झाले होते. निवड झालेल्या उमेदवारांना फक्त प्रशिक्षणासाठी पाठवणं बाकी होतं. पण या विरोधात मदन मेंटके आणि इतर 49 लोकांनी मॅटमध्ये भरतीला आव्हान दिलं होतं.

मदन मेंटके यांच्या वतीने वरिष्ठ वकील सतीश तळेकर यांनी युक्तिवाद केला. त्यावर सुनावणी झाली आणि मॅट कोर्टाने ही भरती स्थगिती करण्याचा निर्णय घेतलाय.