राज्यपालांच्या अभिभाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात

| Updated on: Jul 05, 2019 | 4:22 PM

मुंबई: राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्या अभिभाषणाने राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. राज्यपालांनी पहिली काही मिनिटे मराठीत भाषण केलं. त्यानंतर त्यांनी इंग्रजी भाषणाला सुरुवात केली. गेल्या वर्षीचा अनुभव पाहता, यंदा मराठी अनुवादीत भाषणाची व्यवस्था सरकारने केली होती. विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणाने होत असते. त्यानुसार राज्यपालांनी अभिभाषणाची सुरुवात मराठी भाषेतूनच केली. सुरुवातील 4 ते […]

राज्यपालांच्या अभिभाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात
Follow us on

मुंबई: राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्या अभिभाषणाने राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. राज्यपालांनी पहिली काही मिनिटे मराठीत भाषण केलं. त्यानंतर त्यांनी इंग्रजी भाषणाला सुरुवात केली. गेल्या वर्षीचा अनुभव पाहता, यंदा मराठी अनुवादीत भाषणाची व्यवस्था सरकारने केली होती.

विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणाने होत असते. त्यानुसार राज्यपालांनी अभिभाषणाची सुरुवात मराठी भाषेतूनच केली. सुरुवातील 4 ते 5 मिनिटे मराठीत भाषण केल्यांनतर राज्यपालांनी इंग्रजीमध्ये भाषण करण्यास सुरुवात केली.

राज्यपालांनी सुरुवातील पुलवामा हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर सरकारच्या योजनांची माहिती त्यांनी दिली.

दरम्यान, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी मूक आंदोलन केलं. सभागृहाच्या पायऱ्यांवर निषेध फलक घेऊन, विरोधकांनी निषेध नोंदवला. दंडाला काळ्या फिती लावून हे मूक आंदोलन करण्यात आले.