
मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारनं (MVA Government) डिसेंबर अखेर आणि जानेवारी महिन्याच्या सुरुवातीच्या पंधरावड्यात कोरोनाची (Corona) वाढती रुग्णसंख्या आणि ओमिक्रॉन बाधितांच्या संख्येमुळं निर्बंध (Corona Restrictions ) लागू केले होते. कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आल्यानं राज्य सरकारनं निर्बंध शिथील करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये पहिल्या डोसचं 90 टक्के आणि दुसऱ्या डोस घेणाऱ्यांचं 70 टक्के लसीकरण झालंय याशिवाय 15 ते 18 वयोगटातील मुलांचं राज्य सरकारच्या निर्देशाप्रमाण लसीकरण झालं आहे, अशा जिल्ह्यांमधील कोरोना निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. राज्य सरकारच्या या आदेशाचा 11 जिल्ह्यांना फायदा होणार आहे. मुंबई, पुणे, भंडारा,गोंदिया, चंद्रपूर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सांगली. कोल्हापूर या जिल्ह्यांना सूट नव्या आदेशानं फायदा होणार आहे.
राज्य सरकारनं निर्बंध शिथील करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा फायदा लसीकरण अधिक झालेल्या जिल्ह्यांना होणार आहे. राज्यातील 11 जिल्ह्यांना दिलासा लसीकरण अधिक झालेल्या जिल्ह्यांना निर्बंधातून सूट देण्यात आली आहे. त्या जिल्ह्यातील 90% लोकांचा पहिला डोस पूर्ण हवे आहेत. जिल्ह्यात 70% लोकांचे दोन्ही डोस पूर्ण हवेत. राज्य सरकारच्या नव्या आदेशानं चौपाट्या,गार्डन सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
राज्य सरकारनं जाहीर केलेली नवी नियमावली आजपासून लागू करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील कोरोना प्रादुर्भाव कमी होत असल्यानं ठाकरे सरकारनं लसीकरण अधिक झालेल्या जिल्ह्यांतील निर्बंध शिथील करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या आस्थापना सुरु होतील तेथील कर्मचाऱ्यांचं पूर्ण लसीकरण झालेलं आवश्यक आहे. तर, येणाऱ्या ग्राहकांचं देखील लसीकरण झालेलं असणं आवश्यक आहे. येत्या काळात कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन नवे आदेश लागू केले जाणार आहेत.आजपासून नवी नियमावली मुंबई, पुणे, भंडारा,गोंदिया, चंद्रपूर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सांगली. कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये लागू होईल.
Corona, Omicron Cases Maharashtra LIVE: महाराष्ट्रात कोरोनाच्या 35 हजार नव्या रुग्णांची नोंद
Maharashtra Corona Restrictions removed by Uddhav Thackeray Government in 11 districts including Mumbai Pune Kolhapur Chandrapur and other