Corona, Omicron Cases Maharashtra LIVE: महाराष्ट्रात 14 हजार 372 नवे कोरोना रुग्ण
Corona, Omicron Cases Maharashtra LIVE: महाराष्ट्रात (Maharashtra ) कोरोना (Corona) आणि ओमिक्रॉन (Omicron) वेरियंटचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत असल्याचं समोर आलं आहे.

मुंबई: महाराष्ट्रात (Maharashtra ) कोरोना (Corona) आणि ओमिक्रॉन (Omicron) वेरियंटचे रुग्ण मोठ्या संख्येनं आढळत असल्याचं समोर आलं आहे. राज्यात कोरोनाचा कहर सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यात दिवसभरात आढळून येणाऱ्या कोरोनाचा रुग्णांची संख्या 40 हजारांच्या खाली आली आहे. मंगळवारी राज्यात 14 हजार 372 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 94 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिवसभरात 30 हजार 93 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. राज्यात सध्या 1 लाख 91 हजार 524 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत.
LIVE NEWS & UPDATES
-
राज्यात 14 हजार 372 नवे कोरोना रुग्ण
मंगळवारी राज्यात 14 हजार 372 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 94 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिवसभरात 30 हजार 93 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. राज्यात सध्या 1 लाख 91 हजार 524 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत.
-
कोल्हापूर जिल्ह्याला मोठा दिलासा, पॉझिटिव्हीटी दर घटला
कोल्हापूर जिल्ह्याला मोठा दिलासा
जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट 27 वरून आला 15 टक्क्यांवर
रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांच प्रमाण देखील घटलं
गेल्या काही दिवसापासून कोरोना संख्या आणि पॉझिटिव्हिटी रेट मध्ये होत होती झपाट्यानं वाढ
मात्र गेल्या तीन दिवसा पासून दोन्ही मध्ये होते घट
-
-
महाराष्ट्रात सोमवारी 15140 नवे कोरोना रुग्ण
सोमवारी महाराष्ट्रात 15140 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 39 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिवसभरात 35 हजार 453 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. राज्यात सध्या 2 लाख 7 हजार 350 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत 77 लाख 21 हजार 109 कोरोना रुग्णांची नोंद झालीय. त्यापैकी 73 लाख 67 हजार 259 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सोमवारपर्यंत राज्यात 1 लाख 42 हजार 611 जणांचा मृत्यू झालाय.
Published On - Feb 01,2022 6:10 AM
