Maharashtra Corona Update : 2021 मधील सर्वाधिक रुग्ण, महाराष्ट्रात दिवसभरात 31 हजार 855 जण पॉझिटिव्ह!

| Updated on: Mar 24, 2021 | 9:39 PM

आज दिवसभरात 31 हजार 855 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. दिवसभरात 15 हजार 98 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर दिवसभरात 95 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय.

Maharashtra Corona Update : 2021 मधील सर्वाधिक रुग्ण, महाराष्ट्रात दिवसभरात 31 हजार 855 जण पॉझिटिव्ह!
कोरोना चाचणी करताना डॉक्टर्स
Follow us on

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव काही केल्या थांबताना दिसत नाही. राज्यात मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर अशा शहरांमध्ये मोठ्या संख्येनं रुग्णंसंख्या वाढत आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या मार्गदर्शनानुसार महापालिका आणि जिल्हा प्रशासनाकडून काही कठोर निर्णय घेण्यात आले आहेत. पण तरीही वाढती रुग्णसंख्या रोखता येणं कठीण होत चालल्याचं पाहायला मिळत आहे.(Maharashtra today has the highest number of corona patients in 2021)

राज्यातील आज 2021 मधील सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. आज दिवसभरात 31 हजार 855 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. दिवसभरात 15 हजार 98 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर दिवसभरात 95 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. राज्यात सध्या 2 लाख 47 हजार 299 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यातील आतापर्यंतचा कोरोना रुग्णांचा आकडा 25 लाख 64 हजार 881वर जाऊन पोहोचला आहे. त्यातील 22 लाख 62 हजार 593 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 53 हजार 684 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय.

मुंबईतील कोरोना स्थिती –

मुंबईतील आजचा कोरोना रुग्णांचा आकडा चिंताजनक आहे. मुंबईत आज दिवसभरात 5 हजार 185 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 2 हजार 88 जण कोरोनातून मुक्त झाले आहेत. मुंबईत दिवसभरातील मृतांची संख्या 6 आहे. त्यातील काहीजणांना दीर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 3 पुरुष आणि 3 महिला रुग्णांचा समावेश आहे. मुंबईतील रुग्णसंख्या दुपटीचा दर 84 दिवसांवर आला आहे.

पुण्यातील कोरोना स्थिती –

पुण्यात आज दिवसभरात 3 हजार 509 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर 1 हजार 410 जण पूर्णपणे बरे झाले आहेत. पुण्यात दिवसभरात 33 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून त्यातील 9 रुग्ण पुण्याबाहेरील आहेत. पुणयात सध्या 26 हजार 515 जणांवर उपचार सुरु आहेत. त्यातील 598 रुग्णांची स्थिती गंभीर असल्याचं प्रशासनाने सांगितलं आहे.

पिंपरी-चिंचवडमधील कोरोना स्थिती –

पिंपरी-चिंचवडमध्येही कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. आज दिवसभरात 1 हजार 865 जणांची चाचणी कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. तर 824 जण कोरोनामुक्त झाले आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये आज दिवसभरात 15 डणांचा मृत्यू झाला आहे.

नागपुरातील कोरोना स्थिती –

नागपुरात आज दिवसभरात 3 हजार 717 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. दिवसभरात 2 हजार 98 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर 40 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नागपुरातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता 2 लाख 3 हजार 488 वर जाऊन पोहोचली आहे. त्यातील 1 लाख 65 हजार 179 जण कोरोनामुक्त झाले आहेत. नागुरात आतापर्यंत 4 हजार 737 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

नांदेडमधील कोरोना स्थिती –

नांदेडमध्ये कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव पाहता पुढील 11 दिवस लॉकडाऊन जाहीर करण्यात आलाय. नांदेडमध्ये आज दिवसभरात 1 हजार 165 जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात 6 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. नांदेडमध्ये सध्या 7 हजार 816 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. नांदेडमध्ये गेल्या पाच दिवसात 5 हजार 663 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 42 जणांचा मृत्यू झाला आहे.

सर्वाधिक प्रभावित 10 शहरांच्या यादीत महाराष्ट्रातील तब्बल 9 शहरं

देशात कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित पहिल्या 10 शहरांच्या यादीत महाराष्ट्रातील तब्बल 9 शहरांचा समावेश आहे. तर एक शहर कर्नाटक राज्यातील आहे. अशावेळी महाराष्ट्र सरकारकडून अधिक कठोर निर्बंध लादले जाण्याची शक्यता आहे. तसे संकेत खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.(9 cities in Maharashtra among the top 10 corona affected cities in the country)

कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित महाराष्ट्रातील शहरे

पुणे
नागपूर
मुंबई
ठाणे
नाशिक
औरंगाबाद
नांदेड
जळगाव
अकोला

संबंधित बातम्या :

COVID19 : कोरोनाचा धुमाकूळ, देशातील टॉप 10 मध्ये 9 शहरं महाराष्ट्रातील, ठाकरे सरकार निर्बंध कडक करणार?

Mumbai Corona | मुंबईकरांनो सावधान! कोरोना दुपटीचा कालावधी 186 वरुन 97 दिवसांवर

Maharashtra today has the highest number of corona patients in 2021