दिलासादायक! राज्यात आज 15,169 नव्या रुग्णांची नोंद, 285 कोरोनाबाधितांचा मृत्यू

| Updated on: Jun 02, 2021 | 8:36 PM

राज्यात आज 15,169 रुग्ण सापडलेत. राज्यातील कोरोना संक्रमणाचं प्रमाण हळूहळू कमी होत असल्याचं चित्र निर्माण झालंय. त्यामुळे येत्या काही दिवसांत महाराष्ट्र पुन्हा अनलॉक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. Maharashtra Corona Virus 02 June 2021

दिलासादायक! राज्यात आज 15,169 नव्या रुग्णांची नोंद, 285 कोरोनाबाधितांचा मृत्यू
कोरोना व्हायरस
Follow us on

मुंबईः राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलेलं असून, रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत होती. परंतु आता कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ठाकरे सरकारनं केलेल्या प्रयत्नांनाही यश येताना दिसतंय. राज्यात आज 15,169 रुग्ण सापडलेत. राज्यातील कोरोना संक्रमणाचं प्रमाण हळूहळू कमी होत असल्याचं चित्र निर्माण झालंय. त्यामुळे येत्या काही दिवसांत महाराष्ट्र पुन्हा अनलॉक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Maharashtra Corona Virus The Maharashtra Today 02 June 2021 Found 15,169 New Patients)

राज्यात आज 15,169 नवीन रुग्णांचे निदान

राज्यात आज 15,169 नवीन रुग्णांचे निदान झाले असून, राज्यात आज 285 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालाय. त्यामुळे मृत्यूदर हा 1.67 टक्के एवढा झालाय. राज्यात आज 15,169 नवीन रुग्ण सापडल्यानंतर आज रोजी एकूण 2,16,016 सक्रिय रुग्ण आहेत. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 57,76,184 झालीय.

राज्यात आज 29,270 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत

राज्यात आज 29,270 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत, राज्यात आजमितीस एकूण 54,60,589 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 94.54 % एवढे झाले. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,55,14,594 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 57,76,184 (16.26 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आलेत. सध्या राज्यात 16,87,643 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर 7,418 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीतही वाढ

कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेली मुंबई कोरोनाच्या विळख्यातून मुक्त होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. तसेच बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढलेय. त्याशिवाय मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीतही वाढ झाली. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

संबंधित बातम्या

दिलासादायक! राज्यात आज 18,600 नव्या रुग्णांची नोंद, 402 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू

Maharashtra Lockdown : राज्यातील लॉकडाऊन वाढवला, 15 जूनपर्यंत निर्बंध कायम राहणार

Maharashtra Corona Virus The Maharashtra Today 02 June 2021 Found 15,169 New Patients