Maharashtra Lockdown : राज्यात लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्याय नाही, सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्र्यांची भूमिका

| Updated on: Apr 10, 2021 | 5:40 PM

राज्यात लॉकडाऊनची वेळ आली आहे. लॉकडाऊन शिवाय दुसरा पर्याय नाही अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत मांडली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे.

Maharashtra Lockdown : राज्यात लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्याय नाही, सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्र्यांची भूमिका
उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री
Follow us on

मुंबई : राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा पातळीवर कडक निर्बंध लावले. तसंच विकेंड लॉकडाऊनचा निर्णयही घेण्यात आला आहे. पण विविध उपाययोजना करुनही कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश मिळत नसल्याचं पाहायला मिळतंय. अशावेळी सर्वपक्षीय बैठक घेण्यात येतेय. राज्यात संपूर्ण लॉकडाऊन करण्याचा विचार मुख्यमंत्र्यांसह राज्य सरकारमधील अनेक मंत्री करत आहेत. राज्यात लॉकडाऊनची वेळ आली आहे. लॉकडाऊन शिवाय दुसरा पर्याय नाही अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत मांडली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. (Possibility of complete lockdown in the state once again, hints of CM Uddhav Thackeray)

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुरु झालेल्या या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, नाना पटोले, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह अनेक नेते उपस्थित झाले आहेत. त्याचबरोबर डॉ. तात्याराव लहानेही या बैठकीत सहभागी झाले आहेत. सुरुवातीला राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे हे राज्यातील कोरोना स्थितीची माहिती सर्वांना देत आहेत.

मुख्यमंत्र्यांची भूमिका काय?

कोरोना लसीचा दुसरा डोस देऊनही लोक पॉझिटिव्ह होत आहेत. हा मुद्दा पंतप्रधान मोदींसमोर मांडला होता. सध्या कोरोनाची साखळी तोडणं आणि आरोग्य सुविधा वाढवणं गरजेचं आहे. कालच निर्णय झाला असता पण देवेंद्रजी आपण नव्हता म्हणून आजची ही बैठक बोलावली आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तसंच उद्योगांबाबत बोलताना लोकांचं येणं जाणं कमी केलं पाहिजे. कार्यालयाच्या वेळा बदला, घरातून काम करण्याचं नियोजन करा, पीक आवर ही संकल्पना आता बदलायला हवी, असं मतही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत व्यक्त केलं आहे.

एकमतानेच निर्णय होऊ शकतो – मुख्यमंत्री

लॉकडाऊनबाबत निर्णय घ्यायचा झाल्यास तो एकमताने घेतला गेला पाहिजे. लॉकडाऊन लावल्यास महिन्याभराच्या आत आपण परिस्थिती नियंत्रणात आणू शकतो. पण एकमत झाल्याशिवाय ते शक्य होणार नाही, असं मत मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत मांडलं. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी एकप्रकारे राज्यात संपूर्ण लॉकडाऊनसाठी होकार देण्याचं आवाहनच सर्व पक्षांना केलं आहे. त्यामुळे आता सर्वपक्षीय नेते याबाबत काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

लॉकडाऊन कराल तर आर्थिक मदत द्या – भाजप

राज्य सरकार राज्यात लॉकडाऊन करण्याचा विचार करत असेल तर आधी गोरगरीब, हातावर पोट असलेल्या लोकांना काही मदत द्या. त्यांच्या खात्यावर पैसे टाका आणि मग लॉकडाऊनचा विचार करा. असं केल्यास भाजप लॉकडाऊनचा सकारात्मक विचार करेल, अशी भूमिका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी मांडली काल मांडली होती.

संबंधित बातम्या :

‘कोरोना लसच नाही तर अन्य वैद्यकीय उपकरण वाटपातही महाराष्ट्रसोबत दुजाभाव’, पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप

Maharashtra Lockdown: आधी लॉकडाऊनला विरोध; आता बाळासाहेब थोरात म्हणतात…

Possibility of complete lockdown in the state once again, hints of CM Uddhav Thackeray