महाराष्ट्राला पूर्णवेळ गृहमंत्री असावा, आर. आर. आबांच्या मुलीची मागणी

| Updated on: Jul 05, 2019 | 4:57 PM

विशाल सिंह, टीव्ही 9 मराठी, मुंबई : राजधानी मुंबईवर झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याला दहा वर्षे पूर्ण झाले आहेत. तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या कन्या स्मिता पाटील यांनी सध्याच्या सुरक्षेवर चिंता व्यक्त केली आहे. राज्यात महिलाही सुरक्षित नाहीत, असं म्हणत त्यांनी महाराष्ट्राला पूर्णवेळ गृहमंत्री असावा अशी अपेक्षा व्यक्त केली. स्मिता पाटील यांनी मुंबई हल्ल्यातील […]

महाराष्ट्राला पूर्णवेळ गृहमंत्री असावा, आर. आर. आबांच्या मुलीची मागणी
Follow us on

विशाल सिंह, टीव्ही 9 मराठी, मुंबई : राजधानी मुंबईवर झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याला दहा वर्षे पूर्ण झाले आहेत. तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या कन्या स्मिता पाटील यांनी सध्याच्या सुरक्षेवर चिंता व्यक्त केली आहे. राज्यात महिलाही सुरक्षित नाहीत, असं म्हणत त्यांनी महाराष्ट्राला पूर्णवेळ गृहमंत्री असावा अशी अपेक्षा व्यक्त केली.

स्मिता पाटील यांनी मुंबई हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजलीही वाहिली. 26/11 च्या भ्याड हल्ल्यानंतर आर. आर. आबांनी सांगितलेल्या योजना अद्यापही अंमलात आलेल्या नाहीत. महाराष्ट्राला पूर्णवेळ गृहमंत्री असायला हवा, असं मत स्मिता पाटील यांनी व्यक्त केलं.

हल्ल्यानंतर संवेदनशील परिस्थिती होती. त्यावेळी आबांनी अत्यंत धैर्याने निर्णय घेतले. त्या सगळ्या आठवणींना आज उजाळा मिळतो. तेव्हाची मुंबई आणि आजची मुंबई यात फरक दिसत नाही. राज्यात कोणताच वर्ग सुरक्षित नाही. महिलांवर अत्याचार वाढलेत. बलात्काराच्या घटना वाढल्यात. संपूर्ण महाराष्ट्रच सुरक्षित आहे असं वाटत नाही. गृहमंत्रालय हे स्वतंत्र मंत्र्याकडे देऊन त्याचा कारभार चालवला पाहिजे, अशी मागणी स्मिता पाटील यांनी केली.

आबांनी आणलेल्या काही योजनाच पूर्ण होऊ शकल्या. काही अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आणि हेतूपूर्वक काही गोष्टी डावलल्या गेल्या, अशी शंका स्मिता पाटील यांनी उपस्थित केली. मुख्यमंत्र्यांकडे गृहखातं असताना बलात्काराच्या घटना एवढ्या मोठ्या प्रमाणात घडल्यात. गुन्हेगारी वाढली आहे. माजी गृहमंत्र्याची मुलगी म्हणूनच नव्हे, तर सामान्य नागरिक म्हणून वाटतं, की स्वतंत्र मंत्र्यामार्फत गृहविभाग चालवला जावा, असं स्मिता पाटील म्हणाल्या.