30 जूनला फडणवीस अधिवेशनात बोलले, अन् मुंबईत 11ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांची मोठी कारवाई

ठाणे जिल्ह्यात रात्री उशीरापर्यंत चालणाऱ्या ऑर्कस्ट्रा बारबद्दल विधीमंडळ अधिवेशनात काँग्रेसचे सदस्य नाना पटोले यांनी तारांकित प्रश्न विचारला होता. ३० जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात कायद्यात दुरुस्ती केली जाणार असल्याचे स्पष्ट केले होते.

30 जूनला फडणवीस अधिवेशनात बोलले, अन् मुंबईत 11ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांची मोठी कारवाई
dance bar mumbai
| Updated on: Jul 04, 2026 | 9:30 PM

मुंबईतील ११ आर्केस्ट्रा बारवर पोलिसांनी मोठी धाड टाकत कारवाई केली आहे. या ११ ऑर्केस्ट्रा बारचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. या बारमध्ये महिला वेटर्स आणि नृत्यांगना कडून अश्लिल हावभाव आणि गैरकृत्य सुरु असल्याच्या गुप्त बातमीवरुन हा कारवाई करण्यात आली आहे. हे आर्केस्ट्रा बार डी. बी.मार्ग, अंधेरी, मालाड, दहिसर या ठिकाणचे असून या बारमध्ये पुन्हा असे कृत्य घडले तर त्यांच्यावर अत्यंत कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा मुंबई पोलिसांनी दिला आहे.

ठाणे जिल्ह्यातील ऑर्केस्ट्रा बारमध्ये नियमांचे मोठ्या प्रमाणावर उल्लंघन होत असल्याबाबत काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘परफॉर्मन्स लायसन्स’च्या गैरवापराबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आणि ऑर्केस्ट्रा बारमधील अश्लील नृत्य आणि गैरकृत्याला आळा घालण्यासाठी राज्य सरकार विधानसभा पावसाळी अधिवेशनात विद्यमान कायद्यांमध्ये व्यापक दुरुस्त्या करणारे विधेयक आणणार असल्याचे सांगितले.

कायदेशीर परवानाधारक डान्स बारना कठोर नियमांच्या कक्षेत येत असले तरी, अनेक आस्थापने महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत जारी केलेल्या ‘परफॉर्मन्स लायसन्स’च्या नावाखाली कायद्यातील पळवाटांचा गैरफायदा घेत आहेत. या बहाण्यामुळे अश्लीलतेविरोधातील पोलीसांच्या कारवाईत अडथळा निर्माण झाला आहे. अशा आस्थापनांकडून सुरक्षा आणि सभ्यतेच्या नियमांकडे दुर्लक्ष होणार नाही, हे सुनिश्चित करण्यासाठी सरकार कायदा अधिक कठोर करण्यास कटिबद्ध आहे, असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहाला दिले आहेत. फडणवीस पुढे म्हणाले, “या दुरुस्त्या याच अधिवेशनात मांडल्या जाऊन मंजूर व्हाव्यात, यासाठी प्रयत्न केला जाईल.”

विविध ऑर्केस्ट्रा बार रात्री उशिरापर्यंत चालतात. ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करतात. येथील बेकायदेशीर कारवायांमध्ये वाढ झाल्याबद्दल या चर्चेत आमदारांनी गंभीर चिंता व्यक्त केली. यावर मुख्यमंत्र्यांनी राज्य प्रशासन आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांना कायद्याच्या उल्लंघनावर कारवाई करताना कोणतीही भीती न बाळगता कठोर पावले उचलण्याचे आदेश दिले होते. गेल्या ३० जून रोजी हे आदेश दिले आणि आता मुंबई पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे.

आर्केस्ट्रा बारची नावे

डॉ. दा. भ. मार्ग पोलीस ठाणे हद्दीतील सेनोरिटा, सफायर , सनशाईन पंजाब , राज पॅलेस , ब्ल्यू डायमंड , अंधेरी पोलिस ठाणे हद्दीतील कमांडो, उर्वशी, साई प्रसाद , विलास लंच होम ( अंबोली पोलीस ठाणे ), चिरंजीवी ( दहिसर पोलीस ठाणे ), स्वागतम् ( मालाड पोलीस ठाणे ) अशी कारवाई झालेल्या ऑर्केस्ट्रा बारची नावे आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us