मधमाशांचा तुफान हल्ला, कामावर निघालेल्या कर्मचाऱ्याचा मृत्यू

ठाणे : मधमाशांना हल्ला केल्याने एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना मुरबाडमध्ये घडली. अनंत आंबो करलग असं या दुर्दैवी कर्मचाऱ्याचं नाव आहे. अनंत आंबो करलग हे नेहमीप्रमाणे कामाला जात असताना, अचानक मध्यमाशा आल्या आणि काही कळण्यापूर्वीच त्यांच्यावर हल्ला चढवला. मधमाशांना अनंत करलग यांच्या डोक्याला, चेहऱ्याला अक्षरश: फोडून काढलं. यामुळे त्यांना गंभीर इजा झाली होती. उपचारासाठी त्यांना […]

मधमाशांचा तुफान हल्ला, कामावर निघालेल्या कर्मचाऱ्याचा मृत्यू
| Updated on: Jul 05, 2019 | 3:38 PM

ठाणे : मधमाशांना हल्ला केल्याने एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना मुरबाडमध्ये घडली. अनंत आंबो करलग असं या दुर्दैवी कर्मचाऱ्याचं नाव आहे.

अनंत आंबो करलग हे नेहमीप्रमाणे कामाला जात असताना, अचानक मध्यमाशा आल्या आणि काही कळण्यापूर्वीच त्यांच्यावर हल्ला चढवला. मधमाशांना अनंत करलग यांच्या डोक्याला, चेहऱ्याला अक्षरश: फोडून काढलं. यामुळे त्यांना गंभीर इजा झाली होती.

उपचारासाठी त्यांना तातडीने कल्याणला हलवण्यात आलं. मात्र तोपर्यंत फार उशीर झाला होता. रुग्णालयात पोहोचेपर्यंत त्यांनी प्राणज्योत मालवली.

अनंत करलग हे मुरबाडमधील  MIDC मध्ये कामाला होते. त्यांच्या जाण्याने कुटुंबाचा आधारवड हरपला आहे. या परिसरात मधमाशांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची ही दुसरी घटना आहे.