मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न, जाळीत अडकल्याने प्राण वाचले

| Updated on: Jul 05, 2019 | 4:43 PM

मुंबई: मंत्रालयात पुन्हा एकदा आत्महत्येचा प्रयत्न करण्यात आला. प्रजासत्ताक भारत या पक्षाच्या कार्यकर्त्याने मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेरुन सहाव्या मजल्यावरुन खाली उडी मारली. मात्र मंत्रालय इमारत परिसरात सुरक्षेसाठी जाळी बसवण्यात आल्याने, हा कार्यकर्ता त्या जाळीत अडकला. त्यामुळे त्याचे प्राण वाचले. लक्ष्मण अण्णासाहेब चव्हाण असं या 41 वर्षीय व्यक्तीचं नाव आहे. तो पुण्यातील कोथरूडचा रहिवासी असल्याचं समजतं. लक्ष्मण चव्हाण […]

मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न, जाळीत अडकल्याने प्राण वाचले
Follow us on

मुंबई: मंत्रालयात पुन्हा एकदा आत्महत्येचा प्रयत्न करण्यात आला. प्रजासत्ताक भारत या पक्षाच्या कार्यकर्त्याने मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेरुन सहाव्या मजल्यावरुन खाली उडी मारली. मात्र मंत्रालय इमारत परिसरात सुरक्षेसाठी जाळी बसवण्यात आल्याने, हा कार्यकर्ता त्या जाळीत अडकला. त्यामुळे त्याचे प्राण वाचले. लक्ष्मण अण्णासाहेब चव्हाण असं या 41 वर्षीय व्यक्तीचं नाव आहे. तो पुण्यातील कोथरूडचा रहिवासी असल्याचं समजतं.

लक्ष्मण चव्हाण हे आपल्या मागण्या घेऊन आले होते. शेतकरी आत्महत्या, कुपोषण, बालमृत्यू जोपर्यंत थांबत नाही, तोपर्यंत मुख्यमंत्र्यांनी, मंत्री, आमदारांनी शासकीय निवासस्थाने, त्याचबरोबर व्हीव्हीआयपी, शासकीय लाभांचा त्याग करावा. महाराष्ट्रावर  साडेचार लाख कोटींचे कर्ज आहे, त्यामुळे आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री यांना मानधन देऊ नये अशा मागण्या लक्ष्मण चव्हाण यांनी केल्या.

आपल्या मागण्यांची विविध पत्रकं लक्ष्मण चव्हाण यांनी वरच्या मजल्यावरुन खाली भिरकावली. त्यानंतर त्यांनी स्वत: खाली उडी मारुन जीव देण्याचा प्रयत्न केला. मात्र ते सुरक्षेला लावलेल्या जाळीत अडकले.