AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बीचवर अडकलेल्या ऑईल शिपवर चोरी करायला गेले पण पुढे भयंकर…; 7 पैकी 4 जण दगावले, नेमकं काय घडलं?

मनोरी बीचजवळ मान्सूनमध्ये अडकलेल्या ऑईल शिपवर चोरी करण्यासाठी गेलेल्या 7 जणांच्या टोळीतील 4 जणांचा स्फोटात मृत्यू झाल्याची माहिती आहे.

बीचवर अडकलेल्या ऑईल शिपवर चोरी करायला गेले पण पुढे भयंकर...; 7 पैकी 4 जण दगावले, नेमकं काय घडलं?
Manori Oil Ship ExplosionImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 30, 2026 | 11:23 PM
Share

मुंबईच्या मनोरी येथे अडकलेल्या ऑईल शिपवर चोरी करण्यासाठी गेलेल्या चार चोरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या चोरांनी छोट्या बोटीच्या सहाय्याने मनोरी बीचवर मान्सूनमध्ये अडकलेल्या ऑईल शिपवर यापूर्वी अनेक वेळा चोरी केली होती. त्यानंतर पुन्हा सात जणांची टोळी चोरी करण्यासाठी बोटीने शिपवर पोहोचली होती. त्यापैकी तीन जण बाहेर होते आणि चार जण आतमध्ये गेले होते, त्याचवेळी आतमध्ये काहीतरी स्फोट झाला ज्यात चार चोरांचा मृत्यू झाला आहे. आणि त्यातील एकाने स्वतः पोलिसांना घटनेची माहिती दिली आहे. मात्र मनोरी समुद्रात मान्सूनमध्ये अडकलेल्या ऑईल शिपजवळ गोराई पोलिस, कोस्टगार्ड आणि नेव्हीची टीम दाखल झाली असून प्रकरणाचा तपास करत आहे.

नेमकं काय घडलं?

या चोरांनी पहिल्यांदाच अशा प्रकारे चोराी केली करायचे नियोजन केलेले नव्हते, पण तरीही ही ही घटना घडली. सात जणांनी पुन्हा एकदा ऑईल शिपवर जाऊन आईलची चोरी करायची असं ठरवलं. त्याप्रमाणे त्यांनी नियोजन केलं पण यावेळी त्यांच्यासोबत भयंकर घडणार असल्याची त्यांना कल्पनाही नव्हती. या घटनेनंतर स्वतः चोरांपैकी एका सदस्याने ही माहिती पोलिसांना कळवली.

घटनेची माहिती मिळताच गोराई पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मनोरी समुद्रात अडकलेल्या ऑईल शिपजवळ पोलिसांसह कोस्टगार्ड आणि नेव्हीची टीम दाखल झाली. शिपच्या आत नेमका कोणत्या कारणामुळे स्फोट झाला, याचा तपास केला जात आहे. तसेच शिपमध्ये गेलेल्या सात जणांपैकी चार जणांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचीही माहिती घेतली जात आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सात जणांची ही टोळी छोट्या बोटीच्या सहाय्याने ऑईल शिपपर्यंत पोहोचली होती. यापैकी तीन जण बोटीच्या बाहेर थांबले होते, तर चार जण शिपच्या आतमध्ये गेले होते. त्याचवेळी शिपच्या आत काहीतरी स्फोट झाला. या स्फोटात आत गेलेल्या चारही जणांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर संबंधित यंत्रणांनी शिपजवळ पोहोचून तपास सुरू केला आहे.

दरम्यान, यापूर्वीही या टोळीने मनोरी बीचवर मान्सूनमध्ये अडकलेल्या ऑईल शिपवर चोरी केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा याच शिपवर चोरी करण्यासाठी ही टोळी गेली होती. मात्र यावेळी शिपच्या आत गेलेल्या चार जणांसोबत ही घटना घडली.

Follow Us
अजितदादांच्या आठवणीने फडणवीस भावुक; अमित शाहांकडे केली मागणी...
अजितदादांच्या आठवणीने फडणवीस भावुक; चौकशी अहवालाबाबत अमित शाहांकडे केली मोठी मागणी!
गृहमंत्री शाहांकडून दादांचं भरभरुन कौतुक; सांगितला 'तो' किस्सा
Amit Shah Speech : गृहमंत्री शाहांकडून दादांचं भरभरुन कौतुक; सांगितला 'तो' किस्सा
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; शिंदेंचं विधान
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; एकनाथ शिंदे यांचं भावनिक विधान
पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक...
Sunetra Pawar : पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पह
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पहा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा उल्लेख करत म्हणाले...
बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
Jay Shah : बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई गँगशी कनेक्शन उघड
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह...
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह अनेक नेत्यांची उपस्थिती!
जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर
Latur Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर