चेंबुर येथे म्हैसूर कॉलनीत केमिकल टँकरचा भीषण स्फोट,आजूबाजूच्या परिसरातील इमारतीच्या काचा तुटल्या

चेंबुरच्या जिजामाता नगरातील म्हैसूर कॉलनीतील केमिकल टँकरचा स्फोट झाल्याने दोन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटाची तीव्रता इतकी होती की आजुबाजूच्या इमारतीची तावदाने फुटली.

चेंबुर येथे म्हैसूर कॉलनीत केमिकल टँकरचा भीषण स्फोट,आजूबाजूच्या परिसरातील इमारतीच्या काचा तुटल्या
Massive chemical tanker explosion in Chembur
| Updated on: Jul 17, 2026 | 7:02 PM

चेंबुरच्या जिजामाता नगरातील म्हैसूर कॉलनीतील केमिकल टँकरचा स्फोट होऊन दोन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत टँकरचा चालक आणि वेल्डिंग करणारा कामगार जखमी झाला असून त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. या स्फोटाने रहिवाशांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.

चेंबुरच्या जिजामाता नगरातील म्हैसूर कॉलनीत एका टँकरचे वेल्डिंगचे काम सुरु असताना त्याची गॅसचा मोठा ब्लास्ट झाल्याची घटना घडली. हा ब्लास्ट इतका मोठा होता की आजूबाजूच्या इमारतीच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. त्यामुळे येथील नागरिकांत प्रचंड घबराट पसरली. या घटनेत टँकरचा चालक आणि वेल्डींग करणारा कर्मचारी अक्षरश: काही फूट उडाले. या घटनेत चालक आणि वेल्डर गंभीर जखमी झाले. या जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या स्फोटाने या परिसरातील काही काळ घबराट पसरली. त्यानंतर घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटना स्थळी पोहचले. त्यानंतर येथील जखमी चालक आणि वेल्डिंग करणाऱ्या जखमी कामगारांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

Follow Us