मुंबई सज्ज, पहिल्या दिवशी साडेबारा हजार आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण

vaccine van ला विशेष सुरक्षा पुरवण्यात आल्या आहेत, अशी माहिती किशोरी पेडणकेर यांनी दिली. (Kishori Pednekar On Mumbai Corona Vaccine)

मुंबई सज्ज, पहिल्या दिवशी साडेबारा हजार आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण
Follow us
| Updated on: Jan 15, 2021 | 6:22 PM

मुंबई : देशभरात उद्या 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण केले जाणार आहे. पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमधून देशभरात 13 ठिकाणी लस पाठवण्यात आली आहे. मुंबईसह महाराष्ट्रातही कोरोना लसीकरणासाठी सज्ज झाला आहे. मुंबईतील 9 केंद्रांवर लसीकरण केलं जाणार आहे. या लसीकरणासाठी परेलच्या पालिका कार्यालयातून कोरोना लस केंद्रावर पाठवण्यात आली आहे. तसेच लस वाहतूक करणाऱ्या vaccine van ला विशेष सुरक्षा पुरवण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकेर यांनी दिली. (Kishori Pednekar On Mumbai Corona Vaccine)

“मुंबईत उद्या 9 ठिकाणी कोरोना लसीकरण केले जाणार आहे. यासाठी मी उद्या स्वत: वांद्रे कुर्ला संकुल (BKC) मध्ये जाणार आहे. यासाठी ज्या लोकांनी नोंदणी केली आहे. त्यांना 3 ठिकाणी ओळखपत्र दिले जाईल. त्यानंतर लसीकरण करण्यात येईल,” अशी माहिती किशोरी पेडणेकरांनी दिली.

“ज्या लोकांना कोरोना लस घ्यायची आहे, त्यांचे सर्वात आधी councling केलं जाईल. कोरोना लस घेतल्यानंतर जर कोणाला त्रास झाला, तर त्याला तात्काळ अतिदक्षता विभाग (ICU) मध्ये दाखल करण्यात येईल. यासाठी सर्व सोय करण्यात आली आहे.”

“तसेच एखाद्या व्यक्तीने कोरोना लस घेतल्यानतंर ती 30 मिनिटात घरी जाईल. तसेच पुढील 48 तासात त्याला त्रास झाल्यास कर्मचारी माहिती घेतील,” असेही किशोरी पेडणेकरांनी सांगितले.

12 हजार 500 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण

पहिल्या दिवशी मुंबईतील नऊ केंद्रांमध्ये 12 हजार 500 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट पालिकेच्या आरोग्य विभागाने ठेवले आहे, असेही किशोरी पेडणेकरांनी सांगितले.

मुंबई महानगरपालिकेच्या लोकमान्य टिळक, नायर, केईएम, कूपर, कांदिवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, घाटकोपरच्या राजावाडी, सांताक्रुझमधील व्ही. एन. देसाई, वांद्रे येथील भाभा रुग्णालयात कोरोना लसीकरण केंद्र असेल. तर बीकेसी येथील जम्बो कोविड सेंटरमध्ये सुरू करण्यात आलेल्या लसीकरण केंद्रामध्ये ७२ बूथची व्यवस्था करण्यात आली आहे.

एकूण चार टप्प्यांमध्ये लसीकरण केलं जाणार आहे. याती पहिल्या टप्प्यात 1 लाख 25 हजार वैद्यकीय कर्मचारी, दुसऱ्या टप्प्यात फ्रंट लाईन वर्कर, तिसऱ्या टप्प्यात 50 वर्षावरील नागरिक आणि गंभीर आजर असलेल्या नागरिकांना लस दिली जाणार आहे. तर अखेरच्या टप्प्यात सर्वसामान्य नागरिकांना लस दिली जाईल.

सभागृह, शाळांमध्येही होणार लसीकरण

मुंबईत लसीकरण करता यावे म्हणून केईएम, नायर, सायन, कूपर, राजावाडी, व्ही. एन. देसाई, भाभा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी रुग्णालयात लसीकरण केले जाणार आहे. बीकेसी येथील कोविड सेंटरमध्येही लसीकरण केले जाणार आहे. पालिकेची रुग्णालये, दवाखाने, आरोग्य केंद्र आदी ठिकाणी पुढील काळात लसीकरण केले जाणार आहे.  (Kishori Pednekar On Mumbai Corona Vaccine)

संबंधित बातम्या : 

अमोल मिटकरींना कोरोना लसीवर शंका, मोदींनी मीडियासमोर कोरोना लस घ्यावी, मिटकरींचे आवाहन

Covid vaccine ! कलियुगातील संजीवनी मुंबईत आली; कोरोना लसीच्या वितरणासाठी BMC सज्ज: महापौर

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.