कर्मचाऱ्यांचे थकित वेतन न दिल्यास कंत्राटदार होणार कार्यमुक्त, महापौरांनी दिले आदेश

| Updated on: Feb 10, 2021 | 7:04 PM

कर्मचाऱ्यांचे थकित वेतन न दिल्यास कंत्राटदार होणार कार्यमुक्त, महापौरांनी दिले आदेश (Mayor's order to contractor to pay overdue salaries of employees)

कर्मचाऱ्यांचे थकित वेतन न दिल्यास कंत्राटदार होणार कार्यमुक्त, महापौरांनी दिले आदेश
mayor kishori pednekar
Follow us on

मुंबई : कूपर रुग्णालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे थकित वेतन न दिल्यास संबंधित कंत्राटदाराला कार्यमुक्त करण्याचे आदेश महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले आहेत. कर्मचाऱ्यांच्या तक्रारीनंतर महापौरांनी 24 तासात दखल घेत कारवाईचे आदेश दिले. कूपर रुग्णालयात कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मे. रायझिंग फॅसिलिटी या कंपनीने चार महिन्याचे वेतन थकविले आहे. तसेच सदर कंपनीने कागदपत्रांची योग्य ती पूर्तताही केली नाही. त्यामुळे येत्या मंगळवारपर्यंत कर्मचाऱ्यांचे पगार न दिल्यास सदर कंपनीला कार्यमुक्त करण्याचे आदेश महापौरांनी दिले आहेत. (Mayor’s order to contractor to pay overdue salaries of employees)

बैठकीत कर्मचाऱ्यांच्या समस्येवर चर्चा

मे. रायझिंग फॅसिलिटी ही कंपनी चार महिन्यापासून वेतन देत नसल्यामुळे सदर कंपनीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काल 9 फेब्रुवारी 2021 रोजी महापौरांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन या प्रकरणी न्याय देण्याची विनंती केली होती. त्यानुसार मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, उपमहापौर अॅड. सुहास वाडकर यांनी आज कूपर रुग्णालयाला भेट देत संबंधित कंपनीचे प्रतिनिधी तसेच महापालिका अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत सविस्तर चर्चा केली. (Mayor’s order to contractor to pay overdue salaries of employees)

याआधीही कंपनीने थकवले होते वेतन

सदर कंपनीने यापूर्वीही दोन ते तीन वेळा कर्मचाऱ्यांचे वेतन थकविले होते. मे महिन्यात कर्मचाऱ्यांनी कोविड काळात काम करूनसुद्धा असाच प्रसंग घडला होता. त्यावेळीही महापौरांनी लक्ष घातल्यानंतर यापुढे नियमित वेतन देण्यात येईल, असे आश्वासन कंपनीने दिले होते. याची आठवण कंत्राटी कर्मचाऱ्यांनी यावेळी बैठकीत करुन दिली. त्यानंतरही सदर कंपनीने ऑक्टोबर महिन्यापासून कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन थकविले असून कर्मचाऱ्यांची उपासमार होत असल्याची बाब महापौरांनी सदर कंपनीच्या प्रतिनिधींच्या लक्षात आणून दिली. तसेच संबंधित कंपनी आवश्यक त्या कागदपत्रांची महापालिकेकडे पूर्तता करीत नसल्याची बाबही कूपर रूग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी महापौरांच्या निदर्शनास आणून दिली. त्यासोबतच कागदपत्रांची पूर्तता करण्याबाबत चार ते पाच वेळा पत्र देऊनही सदर कंपनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करून चुकीच्या पद्धतीने दबाव आणत असल्याचीचेही महापौरांच्या निदर्शनास आणून दिले.

कंपनीच्या बँक गॅरंटीमधून वेतन देण्याचे आदेश

या सर्व प्रकरणाची महापौरांनी गंभीरतेने दखल घेऊन सदर कंपनीने येत्या मंगळवारपर्यंत कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन न दिल्यास त्यांना कार्यमुक्त करणे. तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन कंपनीच्या बँक गॅरंटीमधून देण्याचे आदेश दिले. तसेच यापुढील काळात केईएमच्या धर्तीवर बहुउद्देशीय कर्मचाऱ्यांची पदभरती करण्याचे आदेशही महापौरांनी यावेळी दिले. (Mayor’s order to contractor to pay overdue salaries of employees)

 

 

इतर बातम्या

भाजपचं मिशन महापालिका, ओबीसी पुन्हा अजेंड्यावर

भाजपनं हातगुण, पायगुण पहात रहावा, ती त्यांची संस्कृती, आमचा कर्तुत्वावर विश्वास : भाई जगताप