भाजपनं हातगुण, पायगुण पहात रहावा, ती त्यांची संस्कृती, आमचा कर्तुत्वावर विश्वास : भाई जगताप

काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी महाविकासआघाडी सरकार पडणार असल्याच्या भाजपच्या दाव्यावर सडकून टीका केलीय.

भाजपनं हातगुण, पायगुण पहात रहावा, ती त्यांची संस्कृती, आमचा कर्तुत्वावर विश्वास : भाई जगताप
Bhai Jagtap, Congress

मुंबई : काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी महाविकासआघाडी सरकार पडणार असल्याच्या भाजपच्या दाव्यावर सडकून टीका केलीय. तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा चंपा असा उपहासात्मक उल्लेख करत फडणवीसांनंतर चंपा देखील भाकित करत असल्याचा टोला लगावला. भाजपनं हातगुण, पायगुण पाहावा. ती त्यांची संस्कृती आहे, पण आमचा कर्तुत्वावर विश्वास आहे, असंही मत भाई जगताप यांनी व्यक्त केलं. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते (Bhai Jagtap criticize Chandrakant Patil for prediction about Government Formation in Maharashtra).

भाई जगताप म्हणाले, “चंपा म्हणजेच चंद्रकांत पाटील भाकितं करत आहेत. खरंतर आधी हे भाकितं करण्याचं काम देवेंद्र फडणवीस करायचे. आता अलिकडे त्यांनी हे करणं बंद केलंय. तरीही आज ते काय बोलतायत हे मला माहिती नाही. 7 दिवसांनी सरकार पडेल, 10 दिवसांनी पडेल, 1 महिन्याने पडेल, 2 महिन्याने पडेल अशी भाकितं देवेंद्र फडणवीस वारंवार करत होते. आता ती भूमिका चंपा करत आहेत, चंद्रकांत पाटील करत आहेत.”

“मला त्यांनी इतकंच सांगायचं आहे की आम्ही हातगुणावर किंवा पायगुणावर विश्वास ठेवत नाही, तर कर्तुत्वावर ठेवतो. महाराष्ट्राचे कर्तुत्ववान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ज्यांना जनतेने मान्यता दिलीय. माध्यमांनीच याबाबत सर्वे केलाय. केंद्राने महाविकासआघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण तरीही उद्धव ठाकरेंनी कोरोना काळात काम करुन दाखवलं. जगाला धारावी पॅटर्न दिला. त्यामुळे भाजपनं पायगुण आणि हातगुण पाहत रहावं कारण तिच भाजपची संस्कृती आहे,” असंही भाई जगताप यांनी नमूद केलं.

‘राज्यपालांनी सरकारने पाठवलेल्या नावांवर निर्णय घेणं अपेक्षित होतं’

भाई जगताप म्हणाले, “राज्यपालांनी आमदारांची नियुक्ती करणं ही लोकशाहीची एक प्रक्रिया आहे आणि ते टिकवणं गरजेचं आहे. राज्यपाल यांचा हा पूर्ण अधिकार आहे. त्यांच्या अधिकारावर काही बोलण्याचा अधिकार नाहीये, पण आपल्या घटनेच्या चौकटीत हे सुद्धा आहे की सरकार ज्या नावांची शिफारस करेल त्याबाबतीत राज्यपालांनी निर्णय घ्यावा. संविधानात हेच अभिप्रेत आहे. समजा अयोग्य असेल तर तसं त्यांनी लिहावं असंही अभिप्रेत आहे. इतके महिने उलटले, कोरोनाच्या कालावधीमध्ये राज्यपालांना फारसं काही काम नव्हतं.”

हेही वाचा :

भाई जगतापांच्या नेतृत्वात मुंबईत कात टाकतेय काँग्रेस? पाहा आजच्या मोर्चाची गर्दी!

फडणवीसांचं मानसिक संतुलन बिघडलंय, सरकार पाडण्याच्या दाव्यावर भाई जगतापांचा हल्लाबोल

‘प्रभू श्रीरामाने शेतकऱ्यांची बाजू घेतली तर भक्त त्यांनाही देशद्रोही ठरवतील’

संबंधित व्हिडीओ पाहा :

Bhai Jagtap criticize Chandrakant Patil for prediction about Government Formation in Maharashtra

Published On - 5:26 pm, Wed, 10 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI