म्हाडाच्या 14 हजार 621 घरांसाठी ऑगस्ट महिन्यात लॉटरी

| Updated on: Jul 09, 2019 | 6:50 PM

म्हाडाच्या 14 हजार 621 घरांसाठी येत्या ऑगस्ट महिन्यात लॉटरी काढण्यात येणार आहे. म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी याबाबतची माहिती दिली.

म्हाडाच्या 14 हजार 621 घरांसाठी ऑगस्ट महिन्यात लॉटरी
Mhada
Follow us on

मुंबई : म्हाडाच्या 14 हजार 621 घरांसाठी येत्या ऑगस्ट महिन्यात लॉटरी काढण्यात येणार आहे. म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी याबाबतची माहिती दिली. निवडणूक आचारसंहितेपूर्वी म्हाडाच्या कोकण, पुणे, नाशिक,अमरावती, नागपूर  आणि औरंगाबादसह गिरणी कामगारांच्या 14 हजार 621 घरांच्या सोडतीची जाहिरात ऑगस्ट महिन्यात प्रसिद्ध करण्यात येणार आहे, असं उदय सामंत यांनी सांगितलं.

म्हाडा प्राधिकरणाच्या आजच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. पुणे मंडळाच्या हद्दीतील 20 टक्के कोट्यातील 2 हजार घरे,कोकण मंडळाची 5 हजार 300 घरे, नाशिक मंडळाची 92 घरे, औरंगाबाद 148 घरे, अमरावती 1200 घरे आणि नागपूर मंडळाची 891 या घरांचा  या सोडतीमध्ये समावेश आहे.

तसेच गिरणी कामगारांसाठी 5 हजार 90 घरांचाही यात समावेश असल्याचं सामंत यांनी सांगितलं.

याशिवाय रखडलेल्या म्हाडा वसाहतींचा पुनर्विकास म्हाडा स्वतःच करणार असल्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला.