“ज्यांचं डोकं आऊट झालय, त्यांच्याबद्दल काय बोलणार”; शिंदे गटाने जितेंद्र आव्हाड यांच्यावर साधला निशाणा

| Updated on: Feb 07, 2023 | 12:03 AM

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची आणि शौर्याची तुलना मी केली आहे. आणि ती तुलना करताना मी इतिहासातील संदर्भ दिले आहेत त्यामुळे मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले. 

ज्यांचं डोकं आऊट झालय, त्यांच्याबद्दल काय बोलणार; शिंदे गटाने जितेंद्र आव्हाड यांच्यावर साधला निशाणा
Follow us on

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास सांगितला. मात्र त्यावर आता विरोधकांनी जितेंद्र आव्हाड अशी विधानं जाणीपूर्वक करतात अशी टीका त्यांच्यावर करण्यात आली आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यावर आमदार गुलाबराव पाटील यांनी टीका करताना जितेंद्र आव्हाड ज्यांचं डोकं आऊट झालय त्यांच्याबद्दल काय बोलणार असा सवाल त्यांनी केला आहे. त्यामुळे आता भाजप बरोबरच शिंदे गटातील नेत्यांकडूनही जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार निशाणा साधला जात आहे.

सध्या महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी आणि ठाकरे गटातील नेते “आवाज बहुजनांचा, सन्मान महाराष्ट्राचा” या अराजकीय कार्यक्रमाच्या माध्यमातून महापुरुषांचा इतिहास आणि वास्तव माहिती सांगण्यासाठी कार्यक्रम करत आहेत.

या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या एका वाक्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्या इतिहासातील दिलेल्या संदर्भावर त्यांनी केलेली वक्तव्याबाबत विरोधकांकडून त्याच्या वर टीका केली जात आहे. त्यामुळे आता हा वाद आता वाढणार असल्याचे दिसून येत आहे.

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास सांगताना त्यांनी औरंगजेब, अफजलखान आणि शाहिस्तखान या इतिहासाबद्दल सांगताना त्यांनी तुलना केली. त्यामुळे भाजपकडून त्यावर वाद घालण्यात येत आहे.

शिंदे गटातील आमदार गुलाबराव पाटील यांनी जितेंद्र आव्हाड यांचे डोकं आऊट झाल्याचे सांगत त्यांच्यावर घणाघात केला आहे.

भाजप आणि आता शिंदे गटाकडून जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्या बद्दल वाद घालण्यात येत असला तरी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची आणि शौर्याची तुलना मी केली आहे. आणि ती तुलना करताना मी इतिहासातील संदर्भ दिले आहेत त्यामुळे मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले.

जितेंद्र आव्हाड यांनी शिवाजी महाराज यांचा इतिहास सांगतान औरंगजेब, अफजलखान आणि शाहिस्तखान या कट्टर विरोधकांबरोबर लढताना त्यांनी कोणत्या पद्धतीने आपला लढा उभा राहिल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. त्यामुळे आता जितेंद्र आव्हाड यांनी मी माझ्या वक्तव्यावर ठाम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मात्र यावर आता भाजपबरोबरच शिंदे गटातील नेतेही वाद उखरून काढत आहेत. त्यामुळे टीव्ही नाईनशी बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले की, मी सांगितला आहे तो इतिहास सांगितला आहे. त्यामुळे मी माझ्या वक्तव्यावर ठाम असल्याचेही त्यांनी सांगितले.