कोळी समाज दि बा पाटील यांचं नाव विमानतळाला मागतोय म्हणून त्यांना मुंबईबाहेर फेकताय काय?, मनसेचा सेनेला सवाल

| Updated on: Aug 23, 2021 | 9:05 AM

मासळी बाजार मुंबईशी शान आहे. त्यांना मुंबईबाहेर फेकण्याचं काम का होतंय आणि कोण करतंय?, कोळी बांधवांनी काल शंका मांडली की, दि बा पाटील यांचं नाव नवी मुंबई विमानतळाला देण्याची मागणी करतोय म्हणून आम्हाला मुंबई बाहेर फेकण्याचं काम होतंय, असं देशपांडे यांनी सांगितलं.

कोळी समाज दि बा पाटील यांचं नाव विमानतळाला मागतोय म्हणून त्यांना मुंबईबाहेर फेकताय काय?, मनसेचा सेनेला सवाल
संदीप देशपांडे, मनसे
Follow us on

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज मंडईच्या जागेच्या वादावरुन मुंबईत शिवसेना विरुद्ध कोळी बांधव असा संघर्ष रंगला आहे. काही दिवसांपूर्वी महानगरपालिकेकडून घाऊक मासळी बाजार (Fish Market) तात्पुरत्या कालावधीसाठी ऐरोलीला हलवण्यात आला होता. या निर्णयाला स्थानिक कोळी बांधवांनी विरोध केला. मात्र, त्यानंतरही मुंबई महानगरपालिका दखल घेत नसल्याने कोळी बांधव आक्रमक झालेत. आज मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मासळी बाजार मुंबईशी शान असल्याचं सांगत त्यांना  मुंबईबाहेर फेकण्याचं काम कोण आणि का करतंय, असा सवाल विचारला आहे.

कोळी समाज दि बा पाटील यांचं नाव विमानतळाला मागतोय म्हणून त्यांना मुंबईबाहेर फेकताय काय?

मासळी बाजार मुंबईशी शान आहे. त्यांना मुंबईबाहेर फेकण्याचं काम का होतंय आणि कोण करतंय?, कोळी बांधवांनी काल शंका मांडली की, दि बा पाटील यांचं नाव नवी मुंबई विमानतळाला देण्याची मागणी करतोय म्हणून आम्हाला मुंबई बाहेर फेकण्याचं काम होतंय, असं देशपांडे यांनी सांगितलं.

कोळी बांधवांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतलीय. राज ठाकरे आणि संपूर्ण मनसे त्यांच्या सोबत आहे. ते जर विकासकांसाठी रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली मुंबईचे कोळीवाडे, मुंबईचे मच्छी बाजार बाहेर घालवण्याचा डाव आखत असतील तर तो अन्याय आहे. आम्ही अन्यायाविरुद्ध लढू. मनसे कोळी बांधवांसोबत ऊभी राहील, अशी ग्वाही यावेळी संदीप देशपांडे यांनी दिली.

मुंबई महापालिकेवर मच्छीमारांचा मोर्चा

मुंबई पालिकेवर बुधवारी मच्छीमारांचा मोर्चा आहे. मुंबईतील मासळी बाजारांचे मुंबईतच पुनर्वसन करण्याच्या मागणीसाठी मासेविक्रेते येत्या बुधवारी २५ ऑगस्टला पालिका मुख्यालयावर मोर्चा काढणार आहेत.

नेमकं प्रकरण काय?

छत्रपती शिवाजी महाराज मासळी बाजार (क्रॉफर्ड मार्केट) आणि दादर येथील मीनाताई ठाकरे मासळी मंडईचे निष्कासन केल्यानंतर येथील विक्रेत्यांना ऐरोली येथे पर्यायी जागा देण्यात आली होती, परंतु त्यांनी तेथे जाण्यास नकार दिला आहे.

क्रॉफर्ड मार्केट येथील मासळी बाजाराची इमारत धोकादायक असल्याने पाडण्यात आली. तर दादर येथील मासळी बाजारही हटवण्यात आला. दोन्ही बाजारातील घाऊक विक्रेत्यांना आणि पुरवठादारांना ऐरोली येथे पाठवण्यात आले. तर दादर बाजारातील किरकोळ मासेविक्री करणाऱ्या महिलांना मरोळ बाजारात जागा दिली. या दोन्ही बाजारातील विक्रेत्यांचा पर्यायी जागांना विरोध आहे.

(MNS Sandeep Deshpande Question Shivsena over BMC Shifting Wholesale Fish Market koli Community get Aggressive)

हे ही वाचा :

मासळी बाजार नवी मुंबईला हलवला, अरविंद सावंतांची उडवाउडवीची उत्तरं, कोळी बांधव शिवसेनेविरोधात आक्रमक