पक्षातून हकालपट्टी केलेला मनसैनिक पोराबाळांसह ‘कृष्णकुंज’बाहेर दिवसभर उभा

| Updated on: Jul 05, 2019 | 4:27 PM

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसेचा एक कार्यकर्ता पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी त्यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी पोहोचला. महत्त्वाचं म्हणजे या कार्यकर्त्यासोबत त्याचं संपूर्ण कुटुंबही आहे. या कार्यकर्त्याने काही दिवसांपूर्वीच आत्महत्येचा प्रयत्न केला होता. आज हाच कार्यकर्त्या त्याच्या संपूर्ण कुटुंबासह पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आला आहे. अभय मांजरमकर असं या मनसेच्या माजी पदाधिकाऱ्याचं नाव […]

पक्षातून हकालपट्टी केलेला मनसैनिक पोराबाळांसह कृष्णकुंजबाहेर दिवसभर उभा
Follow us on

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसेचा एक कार्यकर्ता पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी त्यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी पोहोचला. महत्त्वाचं म्हणजे या कार्यकर्त्यासोबत त्याचं संपूर्ण कुटुंबही आहे. या कार्यकर्त्याने काही दिवसांपूर्वीच आत्महत्येचा प्रयत्न केला होता. आज हाच कार्यकर्त्या त्याच्या संपूर्ण कुटुंबासह पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आला आहे.

अभय मांजरमकर असं या मनसेच्या माजी पदाधिकाऱ्याचं नाव आहे. अभय मांजरकर हे औरंगाबादचे माजी शहर सहसचिव आहेत. त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षातून काढल्यामुळे काही दिवसांपूर्वी मांजरमकर यांनी विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. ही कारवाई पक्षातील अंतर्गत गटबाजीमुळे आणि आकसापोटी झाली असल्याचं मांजरमकर यांचं म्हणणं आहे. आपली बाजू राज ठाकरे यांच्यासमोर मांडण्यासाठी मांजरमकर आपली आई,पत्नी आणि दोन मुलांसह ‘कृष्ण कुंज’ बाहेर सकाळपासून उभे आहेत. ‘कृष्णकुंज’मध्ये आत जाण्यासाठी त्यांनी अनेकदा प्रयत्न केले, मात्र त्यांना कुणीही आत घेतलं नाही.

या कार्यकर्त्याला काही दिवसांपूर्वी पक्षातून निलंबित केलं होतं. त्यानंतर त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र आज तो पुन्हा राज ठाकरेंच्या भेटीसाठी थेट त्यांच्या दादरमधील घरी दाखल झाला. मात्र राज ठाकरेंची आणि त्याची भेट अद्याप झाली नाही. त्यांना बंगल्यात जाण्यापासून रोखण्यात आलं. त्यामुळे संपूर्ण कुटुंबासोबत मांजरकर खालीच उभे आहेत.