रात्रीत 16 ते 17 मृत्यू पाहिले, उत्तर प्रदेशात ऑक्सिजन न मिळाल्यानं मोहम्मद शमशाद यांनी मुंबई गाठली

उत्तर प्रदेशात ऑक्सिजन मिळत नसल्यानं मोहम्मद शमशाद यांना मुंबईला आणलं गेलं. (Mohammad Shamshad Khan Mumbai) घेतला.

रात्रीत 16 ते 17 मृत्यू पाहिले, उत्तर प्रदेशात ऑक्सिजन न मिळाल्यानं मोहम्मद शमशाद यांनी मुंबई गाठली
मोहम्मद शमशाद खान
| Updated on: May 15, 2021 | 5:45 PM

मुंबई: ऑक्सिजन मिळावा म्हणून मूळचे उत्तर प्रदेशचे राहणाऱ्या मोहम्मद शमशाद खान या 50 वर्षीय व्यक्तीनं मुंबई गाठली आहे. तब्बल 1500 किलोमीटरचा प्रवास करत उत्तर प्रदेशमधून ते मुंबईला पोहोचले. उत्तर प्रदेशात ऑक्सिजन मिळत नसल्यानं मोहम्मद शमशाद खान यांच्या कुटुंबीयांनी हा निर्णय घेतला. मोहम्मद शमशाद खान मुंबईच्या रुग्णालयात उपचारासाठी पोहोचलं आणि त्यांचा जीव वाचला आहे. (Mohammad Shamshad Khan came form Uttar Pradesh to Mumbai for corona treatment)

मोहम्मद शमशाद खान यांना 21 एप्रिलला कोरोना

मोहम्मद शमशाद खान हे 21 एप्रिल रोजी कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्णालयात दाखल झाले. मोहम्मद शमशाद खान यांना तिथे बेड मिळाला पण ऑक्सिजन मिळाला नाही. मोहम्मद शमशाद खान यांना ऑक्सिजनची गरज होती. मात्र, दोन दिवसांनी डॉक्टरांनीही हात वर केले. प्रत्येक ऑक्सिजन सिलेंडर साठी डॉक्टर आणि रुग्णालयातील स्टाफच्या हाता पाया पडायला लागत होते. ऑक्सिजन वेळेवर मिळत नव्हतं,आरोग्य सेवा कोलमडली होती आणि जीवाचं कधी ही बर वाईट होईल अशी परिस्थिती निर्माण झाली होती.

मोहम्मद शमशाद खान यांना मुंबईला आणण्याचा निर्णय

उत्तर प्रदेशातील रुग्णालयात ऑक्सिजन मिळत नव्हता, अशा अवस्थेत मोहम्मद शमशाद खान यांच्या कुटुंबीयांनी त्यांना मुंबईला आणण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचे प्राण वाचले.

उत्तर प्रदेशातील स्थितीवर मोहम्मद शमशाद खान काय म्हणाले?

उत्तर प्रदेशात रुग्णालयात होतो तिथं एका रात्रीमध्ये 16 ते 17 जणांचा डोळ्यासमोर मृत्यू झाला. हे पाहून मी देखील जगतोय की नाही, असं वाटू लागलं होतं. मात्र, डॉक्टर आणि घरच्यांनी धीर दिला आणि त्यानंतर मुंबईला आणण्यात आलं. इथे गेले 17 ते 18 दिवस रुग्णालयात होतो, आता तब्येत बरी आहे, असं मोहम्मद शमशाद खान यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

Black Fungus Mucormycosis Symptoms : काळ्या बुरशीची लक्षणे आणि उपाय काय?

मुंबईतील ‘हाफकिन’ लस निर्मितीसाठी सज्ज, केंद्राकडून 65 कोटींचा निधी, 3 कंपन्यांमार्फत जम्बो लसनिर्मिती

(Mohammad Shamshad Khan came form Uttar Pradesh to Mumbai for corona treatment)