चार दिवसात पाऊस केरळात दाखल होणार

| Updated on: Jun 02, 2019 | 5:49 PM

मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून उन्हाच्या चटक्याने हैराण झालेल्या सर्व सामान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या चार दिवसात मान्सून केरळात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. म्हणजेच 6 किंवा 7 जूनपर्यंत केरळ किनारपट्टीवर पावसाला सुरुवात होईल. जवळपास 5 दिवस केरळ किनारपट्टीवर स्थिरावल्यानंतर येत्या 12 जूनपासून  मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. स्कायमेट […]

चार दिवसात पाऊस केरळात दाखल होणार
Follow us on

मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून उन्हाच्या चटक्याने हैराण झालेल्या सर्व सामान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या चार दिवसात मान्सून केरळात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. म्हणजेच 6 किंवा 7 जूनपर्यंत केरळ किनारपट्टीवर पावसाला सुरुवात होईल. जवळपास 5 दिवस केरळ किनारपट्टीवर स्थिरावल्यानंतर येत्या 12 जूनपासून  मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, 18 मे रोजी अंदमान निकोबार बेटावर मान्सून दाखल झाला होता. अंदमान निकोबार बेटावर मान्सून स्थिरावल्यानंतर पावसाने केरळाच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. त्यानुसार येत्या 6 जूनपर्यंत केरळमध्ये मान्सून दाखल होईल. दरम्यान मान्सून दाखल झाल्यानंतर सुरुवातीला पावसाचा वेग कमी असू शकतो. मात्र 10 जूननंतर पावसाचा जोर वाढायला सुरुवात होईल.

दरवर्षीच्या तुलनेत यंदा केरळात मान्सून उशिराने दाखल होत आहे. दरम्यान पश्चिम किनाऱ्यावर मान्सूनच्या वारे दाखल होत आहेत. त्यामुळे केरळमध्ये पावसाचे आगमन झाल्यानंतर अवघ्या चार ते पाच दिवसातच महाराष्ट्रात पावसाच्या सरी कोसळण्यास सुरुवात होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.  दरम्यान यंदा मान्सून सरासरीच्या ९६ टक्के पडेल, अशी शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे.

दरम्यान राज्यात काल 1 जूनपासून मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली आहे. काल नागपूरमध्ये काही ठिकाणी तुरळक पावसाने हजेरी लावली. त्यानंतर आज 2 जून रोजी धुळे, नगर, नाशिक, शिर्डी या ठिकाणी मान्सून पूर्व पावसाच्या सरी कोसळल्या. यामुळे शेतकरी वर्ग आणि उकाड्याने त्रस्त झालेले नागरिक काही प्रमाणात सुखावले आहेत.