Sanjay Raut : ग्रहण काळात लालबागच्या राजाचं विसर्जन, या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले की…

Sanjay Raut : "सीपी राधाकृषण हे त्याचं पठडीतले आहेत. त्यामुळे देश वाचवायचा असेल, संविधान वाचवायचं असेल, स्वाभिमान टिकवायचा असेल, तर समस्त विरोधी पक्षाचे उमेदवार न्यायमुर्ती सुदर्शन रेड्डी त्या पदासाठी योग्य उमेदवार आहेत"

Sanjay Raut : ग्रहण काळात लालबागच्या राजाचं विसर्जन, या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले की...
Sanjay Raut
| Updated on: Sep 08, 2025 | 11:02 AM

“उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक अत्यंत रंजक आहे. सर्वातआधी भाजपच अभिनंदन केलं पाहिजे. एरवी भाजप मुहूर्त काढून स्थानिक स्वराज्य संस्थांपासून लोकसभेपर्यंत निवडणुका घेतो, हिंदुत्वादी पक्ष म्हणून. यावेळी मुहूर्त न काढता उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक पितृपक्षात घेतली. भाजप सेक्युलर झाला. मुहूर्त, पंचाग पाहत नाही हे त्यांनी दाखवून दिलं, या बद्दल त्यांचं अभिनंदन. नाहीतर मुहूर्त पाहणार, पंचाग पाहणार, तिथी पाहणार म्हणून भाजपने दहा वर्षात पहिल्यांदाच स्वत:ला सेक्युलर घोषित केल्यासारखं वाटतय” असं संजय राऊत म्हणाले. “पितृपक्षाच्या पहिल्या दोन दिवसातच उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार आहे. येणाऱ्या उपरराष्ट्रपतींनी सावध रहायला पाहिजे. कारण आधीच्या उपराष्ट्रपींच काय झालय, अद्याप कळायला मार्ग नाही. जो पर्यंत त्यांचं सार्वजनिक दर्शन होत नाही, तो पर्यंत ते गायब आहेत. त्यांच्याविषयी शंका कायम राहतील” असं संजय राऊत म्हणाले.

“त्यामुळे येणाऱ्या उपराष्ट्रपतींना आधीच्या उपरराष्ट्रपतींनी काय चुका केल्या हे पहावं लागेल. हे होऊ द्यायचं नसेल, तर खासदारांनी निर्भयपणे राष्ट्रहितासाठी बी. सुदर्शन रेड्डी यांना मतदान करावं. अस आमचं आवाहन आहे” असं संजय राऊत म्हणाले. “जगदीप धनखड यांनी थोडा कणा असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांची हकालपट्टी झाली. राजीनामा वैगेरे थोतांड आहे. त्यांना गायब करण्यात आलं” असं संजय राऊत यांनी सांगितलं.

‘मी यावर कसं काय मत व्यक्त करु’

लालबागच्या राजाचा विसर्जन चंद्रग्रहण सुरु असताना झालं असं लोकांच म्हणणं आहे. लालबागच्या राजाच्या व्यवस्थापनाबद्दल शंका उपस्थित केल्यात जातायत असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर राऊत म्हणाले की, “मी यावर कसं काय मत व्यक्त करु. माझ्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत मी अद्याप कधी तिथे गेलो नाही”

…तेव्हा मी लालबागच्या राजाच्या दर्शनाला जाईन

काही कारण आहे का? असा प्रश्न विचारला. त्यावर राऊत म्हणाले की, “मी गणपती दर्शन करत असतो. कोणी बोलावल, तर जातो. घरी गणपती असतो. पण मी तिकडला प्रकार एकंदरीत दिसतो. ते पाहिल्यावर मला वाटलं की त्या गर्दीत अजून एकाची भर नको” “लोकांनाही कळल पाहिजे. हिंदूत्ववादी असतील, श्रद्धा असेल गणपती घरातला, देव्हाऱ्यातला इतर सार्वजनिक क्षेत्रातला गणपती एकच असतो. अलीकडे मला दिसतय लालबागचा राजा अमित शाहना जास्त पावतो. मराठी माणसाला तो जास्त पावताना दिसत नाही. मराठी माणसाला जेव्हा तो पावायला सुरुवात होईल, तेव्हा मी त्या गणपतीच्या दर्शनाला नक्की जाईन” असं राऊत म्हणाले.