AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिवसा होणार काळाकुट्ट अंधार, 2026 च्या पहिल्या सूर्यग्रहणाचा कालावधी जाणून घ्या, थेट भारतात..

2026 च्या वर्षातील पहिले सूर्यग्रहण याच महिन्यात आहे. या ग्रहणाबद्दल लोकांमध्ये मोठी क्रेझ बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे ग्रहणाच्या कालावधीत पूर्णपणे अंधार असेल. ग्रहणाचा कालावधी नक्की काय असणार याबद्दल जाणून घ्या.

दिवसा होणार काळाकुट्ट अंधार, 2026 च्या पहिल्या सूर्यग्रहणाचा कालावधी जाणून घ्या, थेट भारतात..
solar eclipse
| Updated on: Feb 02, 2026 | 8:52 AM
Share

ग्रहणाच्या कालावधीत पृथ्वीवर अनेक बदल होतात. 2026 चे पहिले सूर्यग्रहण याच महिन्यात आहेत. 2026 चे पहिले सूर्यग्रहण हे असल्याने मोठी उत्सुकता याबद्दल नक्कीच आहे. सूर्यग्रहणाच्या कालावधीत अनेक बदल आपल्याला पृथ्वीवर होताना दिसतात. विशेष म्हणजे हे सूर्यग्रहण अत्यंत खास असून सूर्य दिवसा पूर्णपणे काळा होईल आणि त्याच्या फक्त बाजूचा भाग लाल असेल. हे खास क्षण आपल्या डोळ्यांनी टिपण्याची प्रत्येकालाच इच्छा आहे. विशेष बाब म्हणजे ज्यावेळी सूर्यग्रहण सुरू असेल त्यावेळी दिवसा पृथ्वीच्या काही भागांमध्ये काळोखा बघायला मिळेल. अशाप्रकारचे ग्रहण अनेक वर्षांनंतर बघायला मिळेल. संपूर्ण ठिकाणीच नाही तर मोजक्याच भागात हे ग्रहण दिसणार आहे. खगोलशास्त्रज्ञांसाठी हा दिवस अत्यंत खास आहे. अनेक संशोधने यादरम्यान केली जातील. सूर्यग्रहणात सूर्य नेमका कसा बदलत आहे, याचे पूर्ण संशोधन केले जाईल.

सूर्यग्रहण थेटपणे बघणे हा एक अत्यंत मोठा अनुभव असणार आहे. यंदाच्या वर्षीचे पहिले ग्रहण हे 17 फेब्रुवारी 2026 रोजी आहे. मात्र, सगळीकडेच ग्रहण दिसणार नाही. खगोलीय आणि धार्मिक दृष्टिकोनातून सूर्यग्रहण खूप खास मानले जाते. 2026 चे पहिले सूर्यग्रहण मंगळवारी आहे. ग्रहण 17 फेब्रुवारीला नेमके कुठे दिसणार आणि कधी दिसणार याबद्दल लोकांमध्ये प्रचंड मोठी उत्सुकता आहे.

नासाच्या म्हणण्यानुसार, जेव्हा चंद्र त्याच्या कक्षेत पृथ्वीपासून तुलनेने जास्त अंतरावर असतो आणि त्याच वेळी सूर्यासमोर येतो, तेव्हा सूर्यग्रहण होते. यादरम्यान सूर्याच्या भोवती अनेक वेगळावेगळ्या गोष्टी घडताना दिसतात. सतत सूर्यामध्ये बदल होतात. या सूर्यग्रहणाची खास बाब म्हणजे हे ग्रहण तब्बल दोन तासांपेक्षाही अधिक काळ टिकणार आहे.

17 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 3.26 रोजी ग्रहणाला सुरूवात होईल. सूर्यपूर्ण काळा 5.12 वाजता होईल आणि त्याच्या कडेच्या भागाला फक्त प्रकाश दिसेल. सायंकाळी 5.42 ला ग्रहण पूर्णपणे आपल्या स्थितीत येईल. सायंकाळी 7.57 ला सूर्यग्रहण संपेल. मात्र, हे ग्रहण भारतात दिसणार नाहीये. आफ्रिका, अर्जेंटिना, चिली, अंटार्क्टिका या भागात हे ग्रहण दिसणार आहे.

Follow Us
कणाहीन निवडणूक आयोगाची चौकशी करा; राज ठाकरेंनी थेट ज्ञानेश कुमार...
निवडणूक आयोगाचीच चौकशी करा; राज ठाकरेंनी थेट ज्ञानेश कुमारांना घेरलं
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार तत्पर; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे...
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार तत्पर; मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली महत्त्वाची माहिती
राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला इशारा; ‘वेळ आल्यावर...
Rahul Gandhi : राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला इशारा; ‘वेळ आल्यावर... नेमकं प्रकरण काय?
मुख्यमंत्री फडणवीस अमरावती वाशिम दौऱ्यावर दुष्काळी परिस्थितीचा घेणार..
मुख्यमंत्री फडणवीस अमरावती वाशिम दौऱ्यावर दुष्काळी परिस्थितीचा घेणार आढावा
ज्ञानेश कुमार यांच्यामागचा बॉस कोण? संजय राऊतांनी सरळ नावचं सांगून...
ज्ञानेश कुमार यांच्यामागचा बॉस कोण? संजय राऊतांनी सरळ नावचं सांगून टाकलं
अशोक उईकेंचं अभिजीत दीपकेंना थेट आव्हान; आश्रमशाळ मुद्द्यावरून...
अशोक उईकेंचं अभिजीत दीपकेंना थेट आव्हान; आश्रमशाळांच्या मुद्द्यावरून मोठा वाद
लालबागच्या राजाच्या चरणस्पर्श दर्शनाची रांग बंद, मुखदर्शनासाठी गर्दी..
Lalbaugcha Raja 2026 : लालबागच्या राजाच्या चरणस्पर्श दर्शनाची रांग बंद, मुखदर्शनासाठी गर्दी कायम
अभिनेता अजय देवगणला महापालिकेचा मोठा धक्का, थेट जुहूमधील बंगल्याला...
अभिनेता अजय देवगणला महापालिकेचा मोठा धक्का, थेट जुहूमधील बंगल्याला नोटीस
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार