AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Exams Rescheduled : मुंबई विद्यापीठाचा मोठा निर्णय, निवडणुकांमुळे परीक्षांच्या तारखेत केला बदल, आता कधी होणार Exam ?

Exams Postponed due to ZP Election 2026 : आगामी जिल्हा परिषद निवडणुकांमुळे परीक्षांच्या तारखेत बदल करण्यात आला आहेय. मुंबई विद्यापीठाने हा निर्णय घेतला आहे. येत्या 9 व 10 फेब्रुवारीला होणाऱ्या परीक्षांची तारीख आता बदलण्यात आली आहे. कधी होणार परीक्षा ?

Exams Rescheduled : मुंबई विद्यापीठाचा मोठा निर्णय, निवडणुकांमुळे परीक्षांच्या तारखेत केला बदल, आता कधी होणार Exam ?
मुंबई विद्यापीठाकडून परीक्षांच्या तारखेत बदलImage Credit source: social media
| Updated on: Feb 02, 2026 | 8:25 AM
Share

पुढील आठवड्यत होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमुळे मुंबई विद्यापीठाने एक मोठा निर्णय घेतला आहे. येत्या 9 आणि 10 फेब्रुवारीला होणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक आता बदलण्यात आलं आहे. या परीक्षांची तारीख आता पुढे ढकलण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठातर्फे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आलं असून त्यानुसार 9 व 10 तारखेला होणाऱ्या परीक्षा आता फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात घेण्यात येणार आहेत.जिल्हा परिषदेच्या निवडणुका आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आकस्मिक निधन झाल्याने त्याचा डायरेक्ट परिणा हा विद्यापीठाच्या परीक्षांवर झाला आहे

9 व 10 फेब्रुवारीचे पेपर आता कधी ?

मुंबई विद्यापीठाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमुळे 9 फेब्रुवारी आणि 10 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. जे पेपर व 9 व 10 ला होणार होते, ते आता फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजेच 24 आणि फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार आहेत. परीक्षेची तारीख जरी बदलण्यात आली असली तर बाकी काहीही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे आधीच्या वेळापत्रकात जी वेळ दिली होती, त्या वेळेनुसारच 24 व 25 तारखेला या परीक्षा होतील.

खरंतर या निवडणुकांसाठी येत्या 5 फेब्रुवारीला मतदान होऊन 7 तारखेला मतमोजणी करण्यात येणार होती. त्याच दिवशी निकाल लागला असता. मात्र गेल्या आठवड्यात (28 जानेवारी) महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार याचे अपघाती निधन झाले. त्या दिवशी जाहीर करण्यात आलेल्या शासकीय दुखवट्यामुळे सर्व सार्वजनिक कार्यक्रम आणि परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. त्यानंतर निवडणुकांचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला.

पर्यायाने मुंबई विद्यापीठानेही आधी 9 फेब्रुवारी आणि 10 फेब्रुवारी नियोजित केलेल्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान सर्व संबंधित महाविद्यालयांनी या सुधारित वेळापत्रकाची माहिती तातडीने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावी असे निर्देश विद्यापीठाने दिले आहेत. परीक्षेच्या ऐन वेळी विद्यार्थ्यांची ओढाताण होऊ नये आणि संभ्रम निर्माण होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

याआधीही वेळापत्रकात बदल

दरम्यान यापूर्वी महापालिका निवडणुकांमुळेही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. 14 जानेवारी ते 16 जानेवारी दरम्यान होणाऱ्या परीक्षाही विद्यापीठाला पुढे ढकलाव्या लागल्या होत्या. त्या परीक्षा 5फेब्रुवारी ते 7फेब्रुवारीदरम्यान घेण्याचे नियोजन विद्यापीठाने केले होते. मात्र राज्य निवडणूक आयोगाने मागील महिन्यात निवडणुकीची आचारसंहिता जाहीर केल्यावर विद्यापीठाने आधी नियोजित केलेल्या 5 फेब्रुवारी ते 6 फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या होत्या. या परीक्षा 17, 18 फेब्रुवारी आणि 20 फेब्रुवारी होणार आहेत.तसेच विद्यापीठाने बुधवारी, 28 जानेवारीला दुपारच्या सत्राती होणाऱ्या परीक्षाही पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. त्या परीक्षा 3 फेब्रुवारीला दुपारी 2:30 ते 4:30 या वेळेदरम्यान घेतल्या जातील.

Follow Us
मोठी बातमी! त्रिषावरील वक्तव्य भोवलं; उधयनिधी स्टॉलिन यांच्याबाबत...
मोठी बातमी! अभिनेत्री त्रिशावरील वक्तव्य भोवलं; उधयनिधी स्टॉलिन यांच्याबाबत कोर्टाचे तातडीचे निर्देश
सुरज चव्हाणांचा गांधी भवनात राडा; नेमके आदेश दिले कोणी?
NCP Rada | सुरज चव्हाण यांचा गांधी भवनात राडा; नेमके आदेश दिले कोणी?
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह नेमकं कोणाचं, कोर्टात...
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह नेमकं कोणाचं, कोर्टात दोन्ही बाजुने युक्तीवाद अखेर...
बातमीत येण्यासाठी खालच्या स्तराचं राजकारण...
Devendra Fadnavis | बातमीत येण्यासाठी खालच्या स्तराचं राजकारण; काँग्रेसला मुख्यमंत्री फडणवीसांचं जशास तसं उत्तर
जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी, यांची बुद्धी... शिंदे थेट म्हणाले
जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी, यांची बुद्धी... सुनेत्रा पवारांबद्दल आक्षेपार्ह बोलणाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी सुनावलं
विरोधक धर्माचं राजकारण करतायत!; सिद्धिविनायक दानचोरी प्रकरणावर...
Sada Sarvankar | विरोधक धर्माचं राजकारण करतायत!; सिद्धिविनायक दानचोरी प्रकरणावर सदा सरवणकरांचा स्फोटक दावा
दिल्लीत भेटींचे सत्र सुरूच! पुन्हा NCP नेता अमित शाहांच्या भेटीला,
Amit Shah | दिल्लीत भेटींचे सत्र सुरूच! पुन्हा NCP नेता अमित शाहांच्या भेटीला, काय घडलं?
काँग्रेस कार्यालयात घुसलेल्या NCP कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड
Congress | काँग्रेस कार्यालयात घुसलेल्या NCP कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड
काँग्रेस कार्यालयात राष्ट्रवादीची थेट घुसखोरी; आधी माफी मागा म्हणत...
NCP Vs Congress | गुंगी गुडिया पोस्टवरून काँग्रेसला घेरलं; काँग्रेस कार्यालयात राष्ट्रवादीची थेट घुसखोरी; आधी माफी मागा म्हणत...
विमान हवेत असतानाच छताला तडा...प्रवाशांचा जीव मुठीत; एअर इंडियाच्या...
विमान हवेत असतानाच छताला तडा... प्रवाशांचा जीव मुठीत; एअर इंडियाच्या विमानाची पुन्हा भयानक दुर्घटना