AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMC : मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता, पण अर्धी मुंबई ठाकरेंच्या ताब्यात, प्रभागाचा विकास ठाकरे सेनाच ठरवणार, कसं?

मुंबई महापालिकेत महायुतीकडे सर्वाधिक जागा असूनही १८ पैकी ८ प्रभाग समित्यांवर ठाकरे गटाचे वर्चस्व राहणार आहे. यामुळे पूर्ण सत्ता नसतानाही अर्ध्या मुंबईवर ठाकरेंचा प्रभाव कायम राहील. एमआयएमला एक प्रभाग समिती मिळाली असून, काही ठिकाणी सदस्यसंख्या समान असल्याने अध्यक्ष निवडीसाठी चिठ्ठीचा वापर केला जाईल, ज्यामुळे सत्तावाटपाचे नवे समीकरण समोर आले आहे.

BMC : मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता, पण अर्धी मुंबई ठाकरेंच्या ताब्यात, प्रभागाचा विकास ठाकरे सेनाच ठरवणार, कसं?
मुंबई महानगरपालिका
| Edited By: | Updated on: Feb 02, 2026 | 9:00 AM
Share

राज्यातील 29 महापालिकांची निवडणूक होऊन आणि निकाल लागून जवळपास 2 आठवडे उलटलेत. राज्यातील सर्वांच लक्ष वेधणार मुंबई महापालिकेची निवडणूकही यंदा खऊप चुरशीची ठरली. शिवेसना ठाकरे गट- मनसे आणि भाजप – शिंदे यांची महायुतकी, यांच्यात प्रामुख्याने मुंबई महापालिकेसाठी लढत होती. महायुतीने भाजप-शिंदेंनी बहुमत मिळवलं असून त्यांचाच महापौर होणार हे निश्चित . मात्र या नितालाल 2 आठवड्यांपेक्षा जास्त काळ लोटला तरीही महापौर पदाचा निर्णय काहीही झालेला नाही. याच दरम्यान मुंबई महापालिकेत एक मोठा ट्विस्ट पहायला मिळू शकतो. भाजप-शिंदे गटाला बहुमत मिळाल्याने त्यातही भाजपचे जास्त नगरसेवक निवडमून आल्यानेच त्यांचाच महापौर होणार आणि मुंबई पालिकेवर त्यांची सत्ता असणार हे निश्चित आहे. मात्र असं असलं तरीही अर्धी मुंबई ही ठाकरेंच्याच ताब्यात येणार असल्याचं दिसतंय.

प्रभागाचा विकास ठाकरे सेनाच ठरवणार, कसं?

मुंबई महापालिकेच्या 18 प्रभाग समितींपैकी 8 प्रभाग समिती ठाकरेंकडे येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपा शिवसेना महायुतीने सर्वाधिक जागा जिंकून सत्ता काबीज केली आहे. मात्र मुंबई शहर आणि उपनगरातील पालिकेच्या विभागमध्ये महायुती आणि ठाकरे बंधूंची समसमान सत्ता येणार आहे.

महापालिकेमध्ये एकूण विभाग कार्यालयाच्या 18 प्रभाग समिती आहेत. या 18 प्रभाग समित्यांपैकी 8 प्रभाग समित्यांवर ठाकरेंचे नगरसेवक समित्यांच्या अध्यक्षपदी विराजमान होणार आहेत. त्यामुळे ठाकरेंची महानगरपालिकेमध्ये सत्ता नसली तरी अर्ध्या मुंबईवर ठाकरेंचे वर्चस्व राहणार असल्याचे स्पष्ट आहे. यामुळे भाजप-शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसू शकतो. एमआयएमचे ८ नगरसेवक निवडून आल्यामुळे त्यांची गोवंडी एम पूर्व विभागात सत्ता येणार असणार आहे. या प्रभाग समितीवर एमआयएमचे आठ सदस्य तर भाजप शिवसेनेचे सहा व ठाकरे यांचा एक नगरसेवक असणार आहे. भांडुप एस विभाग आणि मुलुंड विभाग प्रभाग समितीवर ठाकरे बंधू आणि महायुतीचे समसमान सदस्य राहणार आहेत. त्यामुळे येथील अध्यक्ष हा चिट्टीवर ठरणार आहे. त्यामुळे या समितीवर कोणत्या पक्षाचा अध्यक्ष विराजमान होणार याचा अंदाज बांधणे शक्य नाही.

कोणत्या प्रभाग समितीवर येणार कोणाची सत्ता ?

१) ए बी इ – महाविकास आघाडी २) सी डी – महायुती ३) एक दक्षिण एफ उत्तर – महाविकास आघाडी ४) जी दक्षिण – महाविकास आघाडी ५) जी उत्तर – महाविकास आघाडी ६) एच पूर्व एच पश्चिम – आघाडी ७) के दक्षिण – महायुती ८) के उत्तर – महाविकास आघाडी ९) के पश्चिम – महायुती १०) पी दक्षिण – महायुती ११) पी पूर्व पी पश्चिम – आघाडी १२) आर दक्षिण – महायुती १३) आर मध्य आर उत्तर – महायुती १४) एम पूर्व – एम आय एम १५) एम पश्चिम – महायुती १६) एस व टी – समसमान सदस्य १७) एल – महाविकास आघाडी १८) एन – महायुती

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं