मुंबईत अवघ्या 30 लाखात घर, ठाकरे सरकारची योजना, ऑक्टोबरमध्ये भूमीपूजन?

| Updated on: Jul 28, 2020 | 9:33 PM

या योजनेनुसार, मुंबईतील गोरेगावात अवघ्या 30 लाखात घर घेता येणार आहे.

मुंबईत अवघ्या 30 लाखात घर, ठाकरे सरकारची योजना, ऑक्टोबरमध्ये भूमीपूजन?
RBI ने का घेतला असा निर्णय? - आर्थिक रिकव्हरीमध्ये (Economic Recovery) रिअल इस्टेट क्षेत्राचं (Real Estate Sector) महत्त्वपूर्ण योगदान असल्याचं RBI ने शुक्रवारी म्हटलं आहे. कारण, या क्षेत्रात फक्त रोजगार मिळत नाही तर हे इतर उद्योगांशीही जोडलं गेलेलं आहे. त्यामुळे या क्षेत्राला चालना देण्यासाठी आणि यातील धोका कमी करण्यासाठी, 31 मार्च 2022 पर्यंत सगळ्या गृह कर्जाला (Housing Loan) कर्जाचे मूल्य (Loan To Valu) शी लिंक केलं जाणार आहे. आर्थिक धोरणांच्या बैठकीनंतर आरबीआयने याची घोषणा केली आहे.
Follow us on

मुंबई : मुंबईत छोटं का होईना पण घर असावं, असे प्रत्येकाचे स्वप्न असते (Home Scheme In Goregaon). याच पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने एक महत्त्वपूर्ण योजना आणली आहे. या योजनेनुसार, मुंबईतील गोरेगावात अवघ्या 30 लाखात घर घेता येणार आहे. पंतप्रधान आवास योजनेअतंर्गत ही गृहनिर्माण योजना तयार करण्यात आली आहे (Home Scheme In Goregaon).

मुंबईत सध्या साध्या घरांची किंमती कोटींच्या वर पोहोचली आहे. मात्र, गोरेगाव सारख्या परिसरात मुंबईकरांना अवघ्या 30 लाखामध्ये घर खरेदी करता येणार आहे. शहरात पहिल्यांदाच अशाप्रकारची गृहनिर्माण योजना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत तयार करण्यात आली आहे.

टाईम्सच्या वृत्तानुसार, या गृहनिर्माण योजनचं भूमीपूजन हे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात होऊ शकतं, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. ऑगस्टमध्ये होणाऱ्या बैठकीत केंद्र सरकार या योजनेला मान्यता देईल, असंही गृहमंत्र्यांनी सांगितलं.ही जागा खासगी मालकीची आहे. तो इको सेन्सेटिव्ह झोन आहे. पण, मागील बैठकीत सर्व माहिती उपलब्ध नसल्याने निर्णय पुढे ढकलण्यात आला होता, असं नोडल एजन्सी असलेल्या म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांनी सांगितलं (Home Scheme In Goregaon).

मुंबईतील हा गृहनिर्माण प्रकल्प सर्वसामान्य आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत अशा नागरिकांसाठी असणार असल्याची माहिती मिलिंद म्हैसकर यांनी दिली. यामध्ये 300 चौ. किमी घराची जागा असणार आहे. ज्यामध्ये विकासकाला त्याला विकसकास फ्लोर स्पेस इंडेक्सला 2.5 मध्ये परवाणगी दिली जाईल. तर यामध्ये 50% हिस्सा हा 1500 ईडब्ल्यूएस युनिटमध्ये प्रकल्पाला असेल तर उर्वरित रक्कम खुल्या बाजारात विक्रीसाठी असणार आहे (Home Scheme In Goregaon).