मुंबई @40 अंश सेल्सिअस; मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात उष्णतेची लाट

मुंबईत सांताक्रुझमध्ये 40.9 अंश तर बोरिवलीत सर्वाधिक 41.3 अंश तापमानाची नोंद झाली. बर्‍याच ठिकाणी तापमानाचे नवनवे विक्रम नोंद होऊ लागले आहेत. (mumbai @40 degree celcious, heat increased in Maharashtra including Mumbai)

मुंबई @40 अंश सेल्सिअस; मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात उष्णतेची लाट
दिल्लीकरांना पुढील आठवड्यात करावा लागू शकतो उन्हाचा सामना
| Updated on: Mar 27, 2021 | 8:52 PM

मुंबई : कोकणासह मुंबई व उर्वरित राज्यात उष्णतेचा कहर वाढला आहे. राजस्थानकडून आलेल्या कोरड्या वार्‍यांमुळे राज्यात उष्णतेची लाट आहे. शनिवारी राज्याच्या बहुतांश भागांत तापमान 40 अंशांच्या पुढे गेले. मुंबईत सांताक्रुझमध्ये 40.9 अंश तर बोरिवलीत सर्वाधिक 41.3 अंश तापमानाची नोंद झाली. ही होरपळ वाढल्यामुळे मुंबई-महाराष्ट्रातील नागरीक दुपारच्या सुमारास घराबाहेर पडताना चांगलेच घामाघूम होत आहेत. (mumbai @40 degree celcious, heat increased in Maharashtra including Mumbai)

बऱ्याच ठिकाणी तापमानाची विक्रमी नोंद

राज्यात यंदा सुर्यनारायण भलताच आग ओकू लागला आहे. बर्‍याच ठिकाणी तापमानाचे नवनवे विक्रम नोंद होऊ लागले आहेत. मुंबई शहर व उपनगरांत पारा 30-31 अंशांच्या सरासरीच्या पातळीवरून वाढीव 10 ते 11 अंशांनी भडकला आहे. मागील दोन दिवस तापमान 38 अंशांच्या पुढे होते. शुक्रवारी चेंबूरमध्ये 40.3 अंशांचा विक्रम नोंद झाला होता. शनिवारी त्यात आणखीन वाढ होऊन बोरीवलीत 41.3 अंशांची नोंद झाली. बोरिवली व चेंबूर परिसरातील पुढचे दोन ते तीन दिवस 39 ते 40 अंशांच्याच पुढे तापमान नोंद होईल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवला आहे.

मुंबईत सर्वाधिक तापमानाची नोंद

संपूर्ण राज्याचा विचार करता मुंबई शहरातच सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. कडक उन्हामुळे दुपारच्या वेळी रस्त्यावरील वर्दळ कमी झालीय. उन्हाचा तडाखा पाहून दुपारच्या वेळेत घरातून बाहेर पडणे टाळत आहेत. नागरीक गारेगार उसाचा रस, कोकम सरबत आणि ताकाने आपली तहान भागवत आहेत. समुद्राकडून जमिनीकडे वाहणारे मतलई वारे उशिरा वाहू लागल्याने पुढील काही दिवस मुंबईचा पारा वरचढ राहील असे भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून सांगण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून गुजरात आणि संपूर्ण कोकणात उष्णतेची लाट जाणवत आहे. कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत 6 अंशांची वाढ नोंदविण्यात आली असून पालघर आणि रत्नागिरी येथील कमाल तापमानाने कहर केला आहे. उष्माघाताने वृद्ध मंडळी, लहान मुले व आजारी लोकांना प्रचंड त्रास होत आहे. नागरिकांना आता मे महिन्यातील वैशाख वणव्याची चिंता सतावत आहे. नागरिकांनी दुपारच्या सुमारास घराबाहेर पडू नये, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे. (mumbai @40 degree celcious, heat increased in Maharashtra including Mumbai)

इतर बातम्या

लॉकडाऊन नाही, पण, आजपासून राज्यभर जमावबंदी, रात्री 8 नंतर ‘या’ गोष्टींना ‘बंदी’; गाईडलाईन जारी

गर्दी टाळण्यासाठी पालकमंत्र्यांची युक्ती, फित न कापता गाड्यांचा ताफा पूलावर नेत लोकार्पण