मानवी संवेदना बोथट झाल्या का? मुंबई विमानतळाच्या कचऱ्या कुंडीत नवजात बालकाचा मृतदेह

Mumbai Crime News: घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवजात अर्भकाला तेथे कोणी सोडले हे शोधण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात आहे.

मानवी संवेदना बोथट झाल्या का? मुंबई विमानतळाच्या कचऱ्या कुंडीत नवजात बालकाचा मृतदेह
crime news
| Updated on: Mar 26, 2025 | 9:07 PM

Mumbai Crime News: पुणे जिल्ह्यातील दौंडमध्ये कचऱ्यामध्ये 6 ते 7 अर्भके सापडल्याची खळबळजनक घटना उघड झाली होती. प्लास्टिकच्या बरण्यांमध्ये ही अर्भक सापडल्याचा प्रकार मंगळवारी समोर आला होता. या धक्कादायक प्रकरणानंतर मुंबईत तसाच प्रकार उघड झाला आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्निनल दोनमध्ये हृदयविदारक घटना सामोर आली आहे. विमानतळाच्या टॉयलेटमध्ये कचर पेटीत एक नवजात बालकाचा मृतदेह मिळाला आहे.

मंगळवारी रात्री 10:30 वाजता विमानतळावरील सुरक्षा अधिकाऱ्यांना टॉयलेटच्या कचरकुंडीत नवजात शिशुचा मृतदेह पडला असल्याची सूचना मिळाली. त्यानंतर सुरक्षा अधिकाऱ्यांनी तत्काळ पोलिसांना बोलवले. मुलास रुग्णालयात नेण्यात आले. त्या नवजात बालकाची तपासणी केल्यावर डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाला असल्याचे स्पष्ट केले. हे 1 दिवसाचे मृत अर्भक होते.

सीसीटीव्ही फुटेजची तपासणी

घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवजात अर्भकाला तेथे कोणी सोडले हे शोधण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात आहे. याशिवाय पोलीस रुग्णालये, निवारागृहे आणि अनाथाश्रमांशी संपर्क साधत असून नुकतेच विमानतळावरून प्रवास केलेल्या प्रवाशांची माहितीही तपासत आहेत.

दरम्यान, विमानतळावरील कचर कुंडीत नवजात बालकाचा मृतदेह टाकण्याचे हे अमानवी कृत्य कोणी केले आहे, याचा लवकरच शोध घेऊ, असे पोलिसांनी सांगितले. ही बाब अत्यंत संवेदनशील असल्याचे सांगून दोषीला कायद्यानुसार कठोर शिक्षा केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

मुंबई पूर्वी पुणे जिल्ह्यातील दौंडमधील बोरावके नगरमध्ये कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये 6 ते 7 अर्भके मिळाली होती. स्थानिकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिल्यावर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोणत्या रुग्णालयाने ती अर्भके फेकून दिली आहेत का, या अनुषंगाने सध्या दौंड पोलिसांकडून तपास सुरू आहे.