AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टरमाइंड कोण? उज्ज्वल निकम यांचा कोर्टात महत्वाचा युक्तीवाद

santosh deshmukh case and ujjwal nikam: सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी देशमुख कुटुंबियांचे वकील पत्र न्यायालयासमोर सादर केले. 12 मार्च रोजी केज न्यायालयात सुनावणी दरम्यान आरोपीच्या वकिलाने मागितले होते. चार्जशीटमधील गोपनीय जबाब आणि डॉक्युमेंट आरोपीच्या वकिलांना देण्यात आले.

संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टरमाइंड कोण? उज्ज्वल निकम यांचा कोर्टात महत्वाचा युक्तीवाद
santosh deshmukh
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Mar 26, 2025 | 2:49 PM
Share

Santosh Deshmukh Murder Case Court Hearing: बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या सुनावणीस कोर्टात सुरुवात झाली. यावेळी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी युक्तीवाद केला. त्यांनी आपल्या युक्तीवादातून संपूर्ण प्रकरणाचा घटनाक्रम कोर्टात मांडला. तसेच या घटनेमागील मास्टरमाइंड कोण? त्याची माहिती न्यायालयात उपलब्ध कागदपत्रांवरुन दिली. तसेच यावेळी आरोपींच्या वकिलांना सर्व कागदपत्रे देण्यात आली. उज्ज्वल निकम यांचा युक्तीवाद झाल्यावर आरोपींच्या वकिलांचा युक्तीवाद झाला.

काय म्हणाले उज्ज्वल निकम

संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी बीड जिल्हा न्यायाधीश व्यंकटेश पाटवदकर यांच्यासमोर सुरु झाली. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर सरकारी वकील उज्वल निकम यांचा युक्तीवाद सुरु झाला. युक्तीवादात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे. उज्वल निकम यांनी ही केस चार्ज फ्रेम करण्यासाठी तयार असल्याचे सांगितले. मात्र आरोपीच्या वकिलाने त्यांना कागदपत्रे न मिळाल्यामुळे चार्ज फ्रेम न करण्याची मागणी केली.

त्या बैठकीत केले मार्गदर्शन

नांदूर फाटा येथील हॉटेल 1 डिंसेबरला तिरंगा येथे वाल्मिक कराडसह आरोपींची बैठक झाली. संपूर्ण घटनेला वाल्मिक कराड याने मार्गदर्शन केले. सीडीआर रिपोर्टमधून ही माहिती बाहेर झाली. यामध्ये गँग लिडर हा सुदर्शन घुले आहे. त्याला वाल्मीक कराड यानेच गाईड केले. सीडीआरमधून फरार असलेला आरोपी कृष्णा आंधळे याने वाल्मीक कराड आणि विष्णू चाटे या दोघांना तीन वेळा फोन केला. सुरवातीला आवादा कंपणीच्या वॉचमेनला सुदर्शन घुले यांनी मारहाण केली, असे निकम यांनी युक्तीवादात सांगितले.

तत्पूर्वी, सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी देशमुख कुटुंबियांचे वकील पत्र न्यायालयासमोर सादर केले. 12 मार्च रोजी केज न्यायालयात सुनावणी दरम्यान आरोपीच्या वकिलाने मागितले होते. चार्जशीटमधील गोपनीय जबाब आणि डॉक्युमेंट आरोपीच्या वकिलांना देण्यात आले. सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी त्यांच्या जवळील केस संदर्भातील कागदपत्रे न्यायालयापुढे सादर केली. सुनावणीसाठी आरोपीचे वकील विकास खाडे, राहुल मुंडे, आनंत तिडके न्यायालयात हजर होते.

आरोपींच्या वकिलांना जवळ जवळ सहाशे पाने कागदपत्रे देण्यात आली. आता संतोष देशमुख हत्याप्रकरणी पुढील सुनावणी 10 एप्रिलला होणार आहे. या सुनावणीसाठी आरोपीचे वकील विकास खाडे, राहुल मुंडे, आनंत तिडके न्यायालयात हजर होते.

हे ही वाचा…

‘विष्णू चाटेने वाल्मीक कराडचा मेसेज सुदर्शन घुलेला दाखवला अन् गेम झाला…’, संतोष देशमुख खटल्यात कोर्टात काय काय झाला युक्तीवाद

Follow Us
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
Poladpur | आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
Jayant Patil | आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा दत्ता मामांना टोला; महिला शेतकरी विधेयकावर खडाजंगी
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
राजकारणात नवा ट्विस्ट! शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा शरद पवारांना फोन; उद्या भेटून सविस्तर बोलू...
मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची...
Ashwini Bhide | मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची मागणी; BMCवर संताप
महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा
Rupali Chakankar | महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून मोठा वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा; दीपाली सय्यद अडचणीत?
रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड काय झाली चर्चा?
मोठी बातमी! रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड नेमकी काय झाली चर्चा?
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत...नेमकं काय घडलं?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
Kishori Pednekar | मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? मॅनहोलमध्ये पडून मृत्यू; BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...नेमकं काय घडतंय?