AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आम्ही आहोत ना… घाबरतोस कशाला? त्याचा जीव वाचवण्यासाठी मुंबईकरांनी अख्खी बसच ढकलली; पाहा व्हिडीओ

Bhandup Bus Accident : कोकणनगर येथील क्रिटिकल रुग्णालयाजवळ भरधाव बेस्ट बसने पादचाऱ्यासह अनेक वाहनांना धडक दिली होती. आता बसच्या मागच्या बाजूला अडकलेल्या पादचाऱ्याला वाचवतानाचा व्हिडिओ समोर आला आहे.

आम्ही आहोत ना... घाबरतोस कशाला? त्याचा जीव वाचवण्यासाठी मुंबईकरांनी अख्खी बसच ढकलली; पाहा व्हिडीओ
Bhandup Bus Accident VideoImage Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Jul 08, 2026 | 4:08 PM
Share

आज सकाळी मुंबईतील भांडुप परिसरात बेस्ट बसचा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. कोकणनगर येथील क्रिटिकल रुग्णालयाजवळ भरधाव बेस्ट बसने पादचाऱ्यासह अनेक वाहनांना धडक दिली होती. बस चालकाने अचानक नियंत्रण गमावल्याने हा अपघात झाल्याचे समोर आले होते. आता या अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे. यात इलेक्ट्रिक बेस्ट बसच्या पाठीमागच्या बाजूला अडकलेल्या पादचाऱ्याला बाहेर काढण्यासाठी प्रवाशांनी अख्खी बस ढकलली असल्याचे समोर आले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

प्रवाशांनी वाचवला पादचाऱ्याचा जीव

समोर आलेल्या माहितीनुसार, बस कोकणनगरकडे वळत असताना चालकाला बस योग्य प्रकारे वळवता आली नाही. त्यामुळे बस रिव्हर्स घेण्यात आली. रिव्हर्स घेत असताना नियंत्रण सुटले आणइ बसचा मागील भाग एका पादचाऱ्याला लागला. त्यामुळे तो पादचारी मोठ्या झाडांच्या कुंडी आणि बसच्या मागील भागामध्ये अडकला. या पादचाऱ्याची सुटका करण्यासाठी घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली आणि बस ढकलली. यामुळे बस पुढे सरकली आणि त्या पादचाऱ्याला बाहेर काढण्यात यश आले.

जखमी पादचाऱ्यावर रुग्नालयात उपचार सुरू

या अपघातात पादचाऱ्याच्या दोन्ही मांड्यांना गंभीर दुखापत झाली असून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. बसच्या कंडक्टरने जखमी व्यक्तीला तातडीने उपचारासाठी मुलुंड येथील अग्रवाल रुग्णालयात दाखल केले असून पोलिसांनी या घटनेच्या तपासाला सुरुवात केली आहे. यातील दोशींवर आता कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

लातूरमध्ये स्कूलबस उलटली, 30 ते 35 विद्यार्थी जखमी

लातूर जिल्ह्यातल्या चाकुर तालुक्यातील राचानावाडी जवळ स्कूल बस उलटल्याने 30 ते 35 विद्यार्थी जखमी झाले आहेत. यापैकी दोन गंभीर जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी लातूरला हलवण्यात आले आहे. सांडोळ , महाडोळ येथील विद्यार्थी स्कूल बसने राचनावाडीकडे निघाले होते. चालक मोबाईलवर बोलत होता त्यामुळे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याकडेच्या खड्ड्यात जाऊन उलटली असं जखमी विद्यार्थ्यांनी सांगितले आहे. किरकोळ जखमी मुलांना चाकूरच्या रुग्णालयात तपासणी आणि प्राथमिक उपचार करून घरी पाठवण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.

Follow Us
NDA मध्ये येताच राष्ट्रवादी शरद पवार गटाला मिळणार मोठं गिफ्ट?
NDA मध्ये येताच राष्ट्रवादी शरद पवार गटाला मिळणार मोठं गिफ्ट? पडद्याआड हालचाली वाढल्या
भारताचा अवकाश क्षेत्रात नवा इतिहास! पहिलं खासगी रॉकेट लॉन्च
भारताचा अवकाश क्षेत्रात नवा इतिहास! पहिलं खासगी रॉकेट यशस्वीरित्या लॉन्च; पहा व्हिडीओ
अजून किती बळी घेतल्यावर धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार?
Uddhav Thackeray | अजून किती बळी घेतल्यावर धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार? सरकारने जाहीर करावं; उद्धव ठाकरेंचा संतप्त सवाल!
सिया केतन प्रकरण! केतनच्या बहिणीची भावनिक हाक; न्यायासाठी थेट.....
सिया केतन प्रकरण! केतनच्या बहिणीची भावनिक हाक; न्यायासाठी थेट.....
भोंदू खरात प्रकरण पुन्हा चर्चेत! ED कडून तब्बल 3000 पानांचं... कोर्टात
Ashok Kharat | भोंदू खरात प्रकरण पुन्हा चर्चेत! ED कडून तब्बल 3000... कोर्टात नेमकं काय घडतंय?
केंद्रात तीन मंत्रिपदे हवीत, शिंदे सेनेची मोठी लॉबिंग; काय घडतंय?
Shivsena | केंद्रात तीन मंत्रिपदे हवीत, शिंदे सेनेची मोठी लॉबिंग; काय घडतंय?
रामगिरीवर खलबतं सुरू! मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला बावनकुळे दाखल; च
Chandrashekhar Bawankule Meet Devendra Fadnavis | रामगिरीवर खलबतं सुरू! मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला बावनकुळे दाखल; चर्चा गुलदस्त्यात?
अन्न व औषध प्रशासनाच्या धडक कारवाईवर मुंबई उच्च न्यायालयाचा आक्षेप;
FDA | अन्न व औषध प्रशासनाच्या धडक कारवाईवर मुंबई उच्च न्यायालयाचा आक्षेप; थेट...
एकच खळबळ! सलग 14 सोशल मीडिया आकाउंट्सवर गुन्हा दाखल; नेमकं काय घडलं?
एकच खळबळ! सलग 14 सोशल मीडिया आकाउंट्सवर गुन्हा दाखल; नेमकं काय घडलं?
पावसाळी अधिवेशनात परिसीमन, महिला आरक्षण विधेयक पुन्हा मांडणार- सूत्र
Monsoon Session | केंद्र सरकारची मोठी तयारी! पावसाळी अधिवेशनात परिसीमन आणि महिला आरक्षण विधेयक पुन्हा मांडणार? - सूत्र
Vikram 1 Launch : ऐतिहासिक आणि अभिमानाचा क्षण, भारताच्या पहिल्या खासगी रॉकेटमधून उपग्रहांचं यशस्वी लॉन्चिंग.

Vikram 1 Launch : ऐतिहासिक आणि अभिमानाचा क्षण, भारताच्या पहिल्या खासगी रॉकेटमधून उपग्रहांचं यशस्वी लॉन्चिंग

अभिमान वाटावा असंच… नीटमध्ये महाराष्ट्राची कन्या मुलींमध्ये देशात पहिली, कोण आहे श्रावणी कुदळे?.

अभिमान वाटावा असंच… नीटमध्ये महाराष्ट्राची कन्या मुलींमध्ये देशात पहिली, कोण आहे श्रावणी कुदळे?

‘आमचा जीव कसा लागणार?’ अभिजीत दीपकेंची आमरण उपोषणाची घोषणा, आई-वडिलांनी सरकारला सुनावले काय?.

‘आमचा जीव कसा लागणार?’ अभिजीत दीपकेंची आमरण उपोषणाची घोषणा, आई-वडिलांनी सरकारला सुनावले काय?

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा मुंबईत नव्हे, तर दिल्लीतच होणार, एनसीपीच्या मंत्र्याचा मोठा दावा; 29 जुलैनंतर….

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा मुंबईत नव्हे, तर दिल्लीतच होणार, एनसीपीच्या मंत्र्याचा मोठा दावा; 29 जुलैनंतर…

पेपरफुटी प्रकरणात तुरुंगात असलेल्या मोटेगावरच्या क्लासची कमाल, नीट परीक्षेत लातूरमध्ये विद्यार्थी पहिला.

पेपरफुटी प्रकरणात तुरुंगात असलेल्या मोटेगावरच्या क्लासची कमाल, नीट परीक्षेत लातूरमध्ये विद्यार्थी पहिला

धर्मेंद्र प्रधान यांना असं काय सोनं लागलं? उद्धव ठाकरे यांचा केंद्राला सवाल; नागपुरात येताच….

धर्मेंद्र प्रधान यांना असं काय सोनं लागलं? उद्धव ठाकरे यांचा केंद्राला सवाल; नागपुरात येताच…