AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई बोट दुर्घटनेत आतापर्यंत 13 जणांनी गमावला जीव, नावं समोर, जखमींचा आकडा किती?

या दुर्घटनेत 98 जण जखमी झाले आहेत. या जखमींपैकी चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. तर पाच जण अद्याप बेपत्ता आहेत. या दुर्घटनेत मृत झालेल्या व्यक्तींमध्ये सात पुरुष, चार महिला व दोन बालकांचा समावेश आहे.

मुंबई बोट दुर्घटनेत आतापर्यंत 13 जणांनी गमावला जीव, नावं समोर, जखमींचा आकडा किती?
मुंबई बोट अपघात
| Updated on: Dec 19, 2024 | 9:22 AM
Share

Mumbai boat tragedy : मुंबईकडून एलिफंटाकडे जाणारी एक प्रवासी बोट गेट वे ऑफ इंडियाजवळ बुडाली. या दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला. या मृतांमध्ये 3 नौदल कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. या बोट दुर्घटनेतून आतापर्यंत 101 प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलं. ‘गेट वे ऑफ इंडिया’कडून जाणाऱ्या प्रवासी बोटीला नौदलाच्या स्पीड बोटने धडक दिली. यामुळे ही दुर्घटना घडली, असं बोललं जात आहे. या दुर्घटनेत 98 जण जखमी झाले आहेत. या जखमींपैकी चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. तर पाच जण अद्याप बेपत्ता आहेत. या दुर्घटनेत मृत झालेल्या व्यक्तींमध्ये सात पुरुष, चार महिला व दोन बालकांचा समावेश आहे.

अरबी समुद्रातील बुचर आयलंड परिसरात ‘नीलकमल’ कंपनीच्या प्रवासी बोटीला नौदलाच्या बोटीने धडक दिली. त्यामुळे भीषण अपघात झाला. दुपारी ३ वाजून ५५ मिनिटांनी ही दुर्घटना घडली. यानंतर बोटीवरील १०१ प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. नौदल, कोस्ट गार्ड आणि पोलिसांनी तात्काळ बचावकार्य सुरू केल्याने मोठी दुर्घटना टळली. आता या दुर्घटनेत किती जणांचा मृत्यू झाला, त्यांची नावे काय, कोणत्या रुग्णालयात किती लोकांवर उपचार याची माहिती समोर आली आहे.

मृत व्यक्तींची नावे

१) महेंद्रसिंग शेखावत ( नेव्ही) २) प्रवीण शर्मा (NAD बोट वरील कामगार) ३) मंगेश(NAD बोट वरील कामगार) ४) मोहम्मद रेहान कुरेशी (प्रवासी बोट) ५) राकेश नानाजी अहिरे( प्रवासी बोट) ६) साफियाना पठाण मयत महिला ७) माही पावरा मयत मुलगी वय-३ तीन ८) अक्षता राकेश अहिरे ९) अनोळखी मयत महिला १०) अनोळखी मयत महिला ११) मिथु राकेश अहिरे वय- ८ वर्षे १२) दिपक व्ही. १३) अनोळखी पुरुष

जखमींचा आकडा किती?

मुंबईतील या बोट दुर्घटनेत जखमी झालेल्यांना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यात जेएनपीटी रुग्णालयात एकूण ५७ जणांना दाखल करण्यात आले होते. त्यातील ५३ प्रवाशांची प्रकृती स्थिर असून ३ जण गंभीर आहेत. तर एकाच मृत्यू झाला आहे. तसेच नेव्हीच्या डॉकयार्ड रुग्णालयात २५ जणांना दाखल करण्यात आले होते. त्यातील २३ जणांची प्रकृती स्थिर असून दोघांचा मृत्यू झाला आहे.

यासोबतच अश्विनी रुग्णालयात १, सेंट जॉर्ज रुग्णालयात ९, कारंजे रुग्णालयात १२ जणांना दाखल करण्यात आले होते. यातील अश्विनी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीची प्रकृती गंभीर आहे. तर सेंट जॉर्ज आणि कारंजे रुग्णालयातील एकूण २१ जणांची प्रकृती स्थिर आहे. यासोबतच मोरा रुग्णालयात १० जणांना दाखल करण्यात आले होते. मात्र दुर्दैवाने या दहा जणांचा मृत्यू झाला आहे.

नीलकमल बोटीत साधारण १२० प्रवाशी प्रवास करत असल्याचे सांगितले जात आहे. यात ११४ जणांचा आतापर्यंत शोध लागला आहे. त्यातील ९७ जणांची प्रकृती स्थिर आहे. तर ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. तसेच १३ जणांचा मृत्यू झाला आहे.

मुख्यमंत्र्यांकडून मदतीची घोषणा

या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून केली जाईल अशी घोषणा देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच घटनेचे गांभीर्य लक्षात घेता या दुर्घटनेची सखोल चौकशी राज्य सरकार आणि नौदलाकडून केली जाईल, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Follow Us
कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल..
मोठी बातमी! कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल एक कोटी....
अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं...
Mumbai | अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं इमर्जेन्सी लँडिंग
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले.
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले... नेमकी भानगड काय?
CJP चा सरकारला अल्टिमेटम! FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
CJP On Students Protest | CJP चा सरकारला अल्टिमेटम! उद्यापर्यंत FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या'
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या' पोस्टची तुफान चर्चा
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? मोठा खुलासा
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? तुकाराम मुंडेंसोबतच्या भेटीबाबत रोहित पवारांचा खुलासा
फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका...
Bharat Gogawale | फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं, व्हिडीओ व्हायरल होताच...
संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक
Om Birla | संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक; नेमकी कोणत्या विषयावर चर्चा?