New Year Celebration : 31 डिसेंबरला वाहतुकीचे नियम मोडाल तर… मुंबई पोलिसांचा इशारा

| Updated on: Dec 30, 2021 | 8:10 PM

दरवर्षी 31 डिसेंबरला अनेक ठिकाणी वाहतूक मोडले जातात, हेच टाळण्यासाठी मुंबई पोलीसही सज्ज झाले आहेत, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा मुंबई वाहतूक पोलिसांकडून देण्यात आला आहे.

New Year Celebration : 31 डिसेंबरला वाहतुकीचे नियम मोडाल तर... मुंबई पोलिसांचा इशारा
Follow us on

मुंबई : मुंबईत कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत आहेत, त्यामुळे 31 डिसेंबरला आणि 1 जानेवारीला गर्दी टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून नवी नियमावली जारी करण्यात आलीय. दरवर्षी 31 डिसेंबरला अनेक ठिकाणी वाहतूक मोडले जातात, हेच टाळण्यासाठी मुंबई पोलीसही सज्ज झाले आहेत, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा मुंबई वाहतूक पोलिसांकडून देण्यात आला आहे. आज मुंबईत तब्बल 3671 कोरोना रुग्ण आढळून आल्याने प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे.

मॉल , चौपाट्यांवर मोठा पोलीस बंदोबस्त

31 डिसेंबरला अनेकजण मॉल, चौपाट्यावर सेलिब्रेशनसाठी जातात. त्यामुळे अशा ठिकाणांवर मोठी गर्दी होते, ही गर्दी टाळण्यासाठी पोलिसांकडून मोठा बंदोबस्त लावण्यात येणार आहे. मुंबईत जमावबंदीच्या काळात 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीला गर्दी टाळण्याचा आव्हान पोलिसांसमोर असणार आहे. कोविडचा प्रादुर्भाव असल्यामुळे रक्ताचे नमुने घेण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक पोलिसांकडून देण्यात आली आहे.

पश्चिम उपनगरात 35 ठिकाणी नाकाबंदी

पोलिसांची पश्चिम उपनगरात 35 ठिकाणीनाकाबंदी असणार आहे. त्याप्रमाणे वाहतूक नियमांचे पालन करणाऱ्या लोकांना पोलिसांच्या वतीने अनोखी भेटदेखील देण्यात येणार आहे आणि जे लोक वाहतुकीचे नियम मोडतील त्यांच्यावर कारवाई करून एक मेसेज दिला जाणार आहेत, अशी माहिती नितीन पवार, पोलीस उपायुक्त, मुंबई वाहतूक विभाग यांनी दिली आहे.

पार्टी-सेलिब्रेशनला बंदी

वाढत्या कोव्हिड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत नवीन वर्षाच्या सेलिब्रेशन पार्ट्यांना आधीच चाप लावण्यात आला आहे. रेस्टॉरंट, हॉटेल, बार, पब, रिसॉर्ट, क्लब यासारख्या कुठल्याही खुल्या किंवा बंदिस्त जागी 30 डिसेंबर ते 7 जानेवारी या काळात न्यू इयर सेलिब्रेशनसाठी जमता येणार नाही. लोकांनी घरातच नवीन वर्षाचे स्वागत करावे, बाहेर पडू नये असे आवाहन महापालिकेकडून वारंवार करण्यात येत आहे.

Corona Virus : दोन दिवसात कठोर निर्बंध, आरोग्यमंत्र्यांचे संकेत; नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्याचं आवाहन

IND VS SA: सचिनला तेंडुलकरला फोन फिरवं, गावस्करांचा विराट कोहलीला प्रेमाचा सल्ला

Nagpur | मनपाच्या 8 ते 10 वीच्या दिव्यांगांना टॅब; नवीन वर्षात विद्यार्थ्यांना मिळणार गणवेश?