AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईतील रेल्वे स्थानकांची नावे बदलण्यावर आज सभागृहात फैसला? कोणत्या स्टेशनला काय मिळणार नाव

assembly session maharashtra: मुंबईतील व्हेक्टोरिया टर्मिनसचे नाव यापूर्वीच बदलण्यात आले. इंग्रजांच्या काळातील असणारे हे नाव छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असे करण्यात आले होते. तसेच पश्चिम रेल्वेमधील एलफिन्स्टन रोड या स्थानकाचे नाव बदलून प्रभादेवी स्थानक केले होते. आता उर्वरित नऊ स्थानकाची नावे बदलण्यात येणार आहे.

मुंबईतील रेल्वे स्थानकांची नावे बदलण्यावर आज सभागृहात फैसला? कोणत्या स्टेशनला काय मिळणार नाव
मुंबई रेल्वे स्थानकावरील नावे बदलण्याचा ठराव
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jul 08, 2024 | 10:33 AM
Share

मुंबईतील स्थानकांना इंग्रजांच्या काळापासून असलेली इंग्रजी नावे आता इतिहास होणार आहे. ही नावे जाऊन रेल्वे स्थानकांना मराठमोळे नाव मिळणार आहे. मुंबईतील उपनगरीय रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा निर्णय काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने घेतला होता. आता यासंदर्भातील ठराव आज सभागृहात येणार आहे. मुंबईतील मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेच्या हद्दीतील नऊ ब्रिटीशकालीन रेल्वे स्थानकाची नावे बदलली जाणार आहे. तसेच राज्यातील कायदा सुव्यवस्था ढासळल्या बाबत आज सभागृहात काँग्रेसच्या आमदारांकडून लक्षवेधी आणली जाणार आहे. यामुळे आजचा दिवस विधिमंडळ अधिवेशनात महत्वाचा ठरणार आहे.

कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिवर घेणार

राज्यातील कायदा सुव्यवस्था परिस्थितीवर विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले यांच्यासह इतर प्रमुख आमदार लक्षवेधीच्या माध्यमातून सरकारला जाब विचारणार आहे. तसेच राज्यात वाढत असलेल्या हिट अँड रनचा मुद्दासुद्धा आज विधानभवनात उपस्थित होऊ शकतो. रात्रभर झालेल्या मुंबईतील पावसामुळे मुंबईची तुंबई झाली. या संदर्भात सुद्धा विधानसभेत आज विरोधक आक्रमक होणार आहेत.

रेल्वे स्थानकाची नावे बदलण्याचा प्रस्ताव

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्रिमंडळाने काही महिन्यांपूर्वी मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे त्याचबरोबर हर्बल रेल्वे स्थानकांच्या नाव बदलण्याचा निर्णय घेतला होता. या संदर्भात ठराव पास करून केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे इंग्रजांच्या काळातील या पाऊलखुणा मिटवण्याकडे एक पाऊल पुढे जाणार आहे.

कोणत्या स्टेशनला काय नाव

  1. मध्य रेल्वेच्या करीरोड स्थानकाला लालबाग
  2. सॅंडहर्स्ट रोड स्थानकाला डोंगरी
  3. पश्चिम रेल्वेच्या मरीन लाईन्स स्थानकाचे नाव मुंबादेवी
  4. चर्नी रोड स्थानकाला गिरगाव
  5. ग्रँटरोड स्थानकाला गावदेवी
  6. हार्बर रेल्वेच्या कॉटनग्रीन स्थानकाला काळाचौकी,
  7. रे रोड स्थानकाला घोडपदेव,
  8. डॉकयार्ड स्थानकाला माझगाव,
  9. किंग्ज सर्कल स्थानकाला तीर्थकर पार्श्वनाथ

मुंबईतील व्हेक्टोरिया टर्मिनसचे नाव यापूर्वीच बदलण्यात आले. इंग्रजांच्या काळातील असणारे हे नाव छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असे करण्यात आले होते. तसेच पश्चिम रेल्वेमधील एलफिन्स्टन रोड या स्थानकाचे नाव बदलून प्रभादेवी स्थानक केले होते. आता उर्वरित नऊ स्थानकाची नावे बदलण्यात येणार आहे.

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली