Mumbai : ‘या’ विद्यार्थ्यांनी मेडिकल, इंडिनिअरींगची फी मुंबई पालिका भरणार! जाणून घ्या नेमकी योजना काय?

| Updated on: Jun 06, 2022 | 7:53 AM

HSC Result 2022 : Mumbai SSC Student News : पालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना 27 प्रकारच्या शैक्षणिक वस्तू मोफत दिल्या जातात.

Mumbai : या विद्यार्थ्यांनी मेडिकल, इंडिनिअरींगची फी मुंबई पालिका भरणार! जाणून घ्या नेमकी योजना काय?
शिक्षकांनी दोन दिवस आगोदर शाळा भरवली
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

मुंबई : दहावीच्या (SSC exam Result 2022) परीक्षेतील उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. मुंबई महानगरपालिकेनं (BMC News) दहावीच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची घोषणा केली आहे. दहावी गुणवंत झालेले जे विद्यार्थी बारावी उत्तीर्ण होऊन मेडिकल आणि इंजिनिअरींगसारख्या (Medical & Engineering Study) अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतील, त्यांचा शैक्षणिक खर्च पालिका उचलणार आहे. अशा विद्यार्थ्यांची फी ही मुंबई पालिका भरणार आहे. यासाठी नेमके कोणते विद्यार्थी पात्र असणार आहेत, हे देखील स्पष्ट करण्यात आलंय. पालिका शाळांमधील दहावीच्या परीक्षेत पहिल्या 25 मध्ये येणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी पालिकेनं हा निर्णय घेतलाय. पालिका शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांच्या मेडिकल आणि इंडिनिअरींग शिक्षणाच्या फीचा खर्च पालिका भरणार आहेत.

पालिका विद्यार्थ्यांसाठी खास उपक्रम

पालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना 27 प्रकारच्या शैक्षणिक वस्तू मोफत दिल्या जातात. त्याशिवय मोफत बेस्ट प्रवास, डिजिटल क्लासरुप, टॅब यामुळे गरजू विद्यार्थ्यांना मदतही होते. मुंबईतील सर्वसामान्य कुटुंबातील आणि गरिब घरातून आलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची समान संधी मिळावी आणि त्यांच्या गुणांना वाव मिळावा यासाठी पालिकेकडून वेगवेगळ्या योजना राबवल्या जात असतात.

याच पार्श्वभूमीवर आता दहावी परीक्षेत पहिल्या 25 मध्ये येणाऱ्या पालिका शाळांमधील मुलांसाठी दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे गरीब कुटुंबातील आणि मुंबईच्या पालिका शाळेत शिकणारी मुलंही इंजिनिअर आणि मेडिकल प्रवेशाचं स्वप्न साकार करु शकणार आहेत.

हे सुद्धा वाचा

या उपक्रमाअंतर्गत 2020 मध्ये दहावीची परीक्षा दिलेले विद्यार्थी आता बारावी उत्तीर्ण होतील. या विद्यार्थ्यांपैकी जे विद्यार्थी मेडिकल आणि इंजिनिअरींग सारख्या उत्त शिक्षणासाठी जाऊ इच्छितात, तसंच जे प्रवेश प्रक्रियेलाही पात्र ठरतील, अशांना पालिका मदत करणार आहेत. तसंच तांत्रिक (टेक्निकल), व्यावसायिक पदवीचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक फी दिली जाणार आहेत.

काय म्हणाले शिक्षण सहआयुक्त?

याबाबत शिक्षण सहआयुक्त अजित कुंभार यांनी सविस्तर माहिती दिली आहे. पालिकेच्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावं, अद्ययावत सुविधा दिल्या दाव्यात, पालिका शाळेतील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी कला-क्रीडा आणि इतर उपक्रम हाती घेण्यात येत असल्याचं कुंभार यांनी म्हटल्ंय. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सध्याच्या प्रचंड स्पर्धेच्या युगात पालिका शाळेतील विद्यार्थीही यशस्वी व्हावेत, यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावं, म्हणून हा निर्णय घेण्यात आला असल्याचं ते म्हणालेत.

पालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी क्रीडा प्रबोधिनी

  1. येत्या काळात इंटरनॅशनल दर्जाची मैदानं उपलब्ध करुन देण्यात येणार
  2. पहिल्या टप्प्यात 100 क्रीडांगणांचा कायापालट होणार
  3. नॅशनल स्पोर्ट्स अथोरीटीच्या धर्तीवर क्रीडा प्रबोधिनी सुरु करणार
  4. नेमबाजी, बॅडमिंटन, क्रिकेट, बॉक्सिंग, कबड्डी, अशा खेळांमध्ये प्रावीण्य असलेल्या विद्यार्थ्यांचा समावेश
  5. तज्ज्ञ प्रशिक्षण आणि डायटेशिअरनचीही केली जाणार नेमणूक