शिक्षकांवर लाठीचार्ज झाल्यानंतर आमदारांचीही आंदोलनात उडी

| Updated on: Aug 27, 2019 | 6:34 PM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी आक्रमक झालेल्या शिक्षकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. यानंतर आता विरोधी पक्षातील आमदारांनीही आंदोलनात (Mumbai Teachers protest) उडी घेतली आहे.

शिक्षकांवर लाठीचार्ज झाल्यानंतर आमदारांचीही आंदोलनात उडी
Follow us on

मुंबई : विनाअनुदानित शिक्षकांच्या अनुदानासाठी मुंबईतील आझाद मैदानात सुरु असलेल्या आंदोलनाला (Mumbai Teachers protest) सोमवारी वेगळंच वळण मिळालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी आक्रमक झालेल्या शिक्षकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. यानंतर आता विरोधी पक्षातील आमदारांनीही आंदोलनात (Mumbai Teachers protest) उडी घेतली आहे. आमदार विक्रम काळे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही आंदोलनस्थळी जाऊन शिक्षकांना पाठिंबा दिला.

धनंजय मुंडे यांना विधानभवनाच्या प्रवेशद्वारावरच अडवण्यात आलं. यानंतर धनंजय मुंडे आणि सुरक्षा रक्षकांमध्ये शाब्दिक बाचाबाचीही झाली. आमदारांना अडवण्याचा अधिकार कुणी दिला? कसले नियम सांगताय? आम्हाला काही अधिकार आहेत की नाही? असे सवालही धनंजय मुंडेंनी सुरक्षा रक्षकांना केले.

शिक्षकांवर झालेला लाठीचार्ज हा दुर्दैवी असून त्याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी विक्रम काळे यांनी केली. सरकारला अनुदान द्यायचं नसल्यामुळे चालढकल केली जात आहे. मुख्यमंत्र्यांनी ठरवलं तर तासाभरात हे काम होईल, पण त्यांची हे काम करण्याची इच्छा नाही. शेवटच्या काही कॅबिनेट राहिल्या असतानाही काम केलं जात नाही. ज्यांना खरंच जनादेश आहे, त्यांना अशा महाजनादेश यात्रेची गरजच काय? असा सवालही विक्रम काळे यांनी केला.