Mumbai Toll Rates : मुंबईत एन्ट्री महागली! मिनी बसपासून अवजड वाहनांपर्यंत टोलमध्ये मोठी वाढ

मुंबई शहरात प्रवेश करणाऱ्या व्यावसायिक वाहनांना आजपासून वाढीव टोल दराने प्रवास करावा लागणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) मुंबईच्या पाचही महत्त्वाच्या प्रवेशद्वारांवर टोलमध्ये सुमारे 20 टक्के वाढ जाहीर केली आहे. हे नवीन दर आजपासून (दिनांक) लागू झाले आहेत.

Mumbai Toll Rates : मुंबईत एन्ट्री महागली! मिनी बसपासून अवजड वाहनांपर्यंत टोलमध्ये मोठी वाढ
toll plaza
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 02, 2026 | 3:41 PM

मुंबईत वाहन घेऊन यायचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी. मुंबईत पाय ठेवण्याआधी तुमच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता आहे. कारण कर्मशिअल वाहनांवर अधिक कर आकारले जाण्याची शक्यता आहे. १ ऑक्टोबरपासून हे नियम लागू होणार आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हे सुधारित दर लागू केले आहेत. नवीन दरानुसार मिनी बस आणि लाईट कर्मिशिअल वाहनांवर आधी 75 रूपये टोल आकारला जात होता. आता त्यासाठी ९० रुपये द्यावे लागणार आहेत. ट्रक आणि बसच्या टोलमध्येही वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी १५० रूपये असलेला टोल आता १८० रूपये झाला आहे. म्हणजेच या वाहनांना प्रत्येक फेरीसाठी ३० रूपये अधिक द्यावे लागतील. तर अवजड वाहनांसाठी टोल १९० रूपयांवरून २२५ रुपये करण्यात आला आहे. या वाहनांच्या टोलमध्ये ३५ रूपयांची वाढ झाली आहे. ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us