Mumbai Weather Alert | मुंबईत थंडीचा जोर वाढला, 16 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

| Updated on: Dec 22, 2020 | 10:23 AM

मुंबईतील हवामानात गारठा वाढला आहे. उत्तरेकडील शीतलहरीमुळे मुंबईतील पारा खाली घसरला आहे.

Mumbai Weather Alert | मुंबईत थंडीचा जोर वाढला, 16 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
Follow us on

मुंबई : मुंबईकरांनाही आता गुलाबी थंडीची चाहुल लागायला सुरुवात झाली आहे (Mumbai Weather Alert). गेल्या दोन आठवड्यांपासून राज्यात थंडीने हुडहुडी भरली होती. मात्र, मुंबईकर थंडीच्या दिवसातील गारव्यापासून वंचित होते. मात्र, आता मुंबईतही गारवा वाढू लागला आहे (Mumbai Weather Alert).

मुंबईतील हवामानात गारठा वाढला आहे. उत्तरेकडील शीतलहरीमुळे मुंबईतील पारा खाली घसरला आहे. मुंबईतील सांताक्रुझ येथे आज 16 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. हवामान खात्याने याबाबतची माहिती दिली आहे. हे मुंबईतील या सत्रातील सर्वात नीचांकी तापमान आहे.

हवामान विभागाच्या (आयएमडी) पश्चिम विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी याबाबत ट्वीट करत माहिती दिली. ‘अपेक्षेनुसार आज सकाळी मुंबईचा पारा घसरला. मुंबईतील सांताक्रुझ येथे आज 16 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. काळजी घ्या आणि बहुप्रतिक्षित मुंबईतील हिवाळ्याचा आनंद घ्या”, असं ट्वीट त्यांनी केलं.

येत्या काही दिवसात मुंबईसह उपनगरातील पारा घसरणार अशी माहिती शनिवारी हवामान विभागाने दिली होती. सोमवापरपासून मुंबईसह ठाणे आणि उपनगरसोबतच कोकण आणि विदर्भातील तापमानात मोठी घट होणार असल्याचीही माहिती हवामान विभागाने दिली होती (Mumbai Weather Alert).

त्यानुसार, गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतील तापमानात घट होण्यास सुरुवात झाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज मुंबईकरांनाही गुलाबी थंडी अनुभवायला मिळाली आहे. तसेच, येत्या एक-दोन दिवस तापमान असंच असणार आहे, अशीही माहिती हवामान विभागाने दिली आहे.

Mumbai Weather Alert

संबंधित बातम्या :

Weather Alert : राज्यात हुडहुडी! निफाडमध्ये नीचांकी तापमानाची नोंद, तर महाबळेश्वरमध्ये दवबिंदू गोठले

महाराष्ट्रात आता पुन्हा-पुन्हा वादळं, पाऊस येणार? संशोधनात धक्कादायक खुलासा

Nagpur | नागपूरसह विदर्भात वाढणार थंडी, हवामान खात्याचा अंदाज

Weather Alert : महाराष्ट्र गारठला! नागपूरसह विदर्भातही हुडहुडी, निफाडमध्ये थंडीने रेकॉर्ड मोडला