अनैतिक संबंधात आडकाठी, पत्नीकडून प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या

| Updated on: Feb 22, 2020 | 6:31 PM

मुंबईतील मालवणी परिसरात एका विवाहित महिलेनी प्रियकारासोबत कट रचून नवऱ्याचा खून केल्याची घटना घडली आहे.

अनैतिक संबंधात आडकाठी, पत्नीकडून प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या
Follow us on

मुंबई : मुंबईतील मालवणी परिसरात एका विवाहित महिलेनी प्रियकारासोबत कट रचून नवऱ्याचा खून केल्याची घटना घडली आहे (Murder of husband due to external affair). आरोपी महिलेने झोपेच्या गोळ्या देऊन नवऱ्याची हत्या केली आणि हा मृत्यू नैसर्गिक दाखवण्यासाठी डॉक्टरांकडून तसं मृत्यूचं प्रमाणपत्रही मिळवलं. मात्र, अखेर त्यांचा हा डाव उघड झाला. या कटात एक डॉक्टरही सहभागी असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांना आरोपींना अटक केली आहे, मात्र आरोपी डॉक्टर अद्याप फरार आहे.

दोघांनी लग्न मंडपात अग्नीला साक्ष ठेऊन सात फेरे घेतले होते. एकमेकांसोबत आयुष्य जगण्याचा निश्चय केला होता. मात्र, त्यानंतरही पत्नीने विश्वासघात करुन पतीची हत्या केली. यासाठी तिने आपल्या प्रियकरालासोबत घेऊन कट रचला आणि 20 डिसेंबर 2019 रोजी त्याप्रमाणे हत्याही केली. विशेष म्हणजे हत्येनंतर हे सर्व नैसर्गिक वाटावं म्हणून त्यांनी डॉक्टरकडून नैसर्गिक मृत्यू झाल्याचा प्रमाणपत्रही घेतलं. यानंतर पीडित महेश विष्णु पटेल यांचा 21 डिसेंबर 2019 रोजी मढ येथील स्मशानभूमीत अत्यंसंस्कारही करुन टाकले. मात्र, अखेर त्यांच्या या हत्येच्या कटाचा भांडाफोड झाला.

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला संबंधित मृत्यू नैसर्गिक नसून हत्या करण्यात आल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्याप्रमाणे पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली. सुरुवातीला महिलेच्या प्रियकराला आणि एका रिक्षा चालकाला अटक करण्यात आली. त्यानंतर आरोपी महिलेलाही पोलिसांनी अटक केली. तपासात आरोपींकडून अनेक धक्कादायक खुलासे झाले. आरोपी महिला आणि तिच्या प्रियकराने कट रचून हत्या केली होती. त्यासाठी झोपेच्या प्रतिबंधित गोळ्यांचा वापर करण्यात आला होता. आरोपी महिलेने आपल्या नवऱ्याला सकाळी 4 गोळ्या आणि रात्री जेवनानंतर 10 गोळ्या दिल्या होत्या. त्यानंतर नवरा बेशुद्ध झाल्यानंतर उशीने त्याचा गाला दाबून खून केला, अशी माहिती पोलीस अधिकारी दत्ता नलावडे यांनी दिली.

आरोपी महिलेचे इतर एका व्यक्तीसोबत अनैतिक संबंध होते. यात पतीचा अडथळा होता. त्यामुळे प्रियकराच्या मदतीने तिने पतीची निर्घृण हत्या केली. यामध्ये एका रिक्षाचालकाचा आणि एका डॉक्टराचाही समावेश आहे. या प्रकरणात या दोघांचा हेतूही तपासला जात आहे. नैसर्गिक मृत्यूचं खोटं प्रमाणपत्र देणारा डॉक्टर अद्याप फरार आहे.

Murder of husband due to external affair