कितीही सरवासारव केली तरी… नागपूर पदवीधरमधील पराभवानंतर ट्वीटही डिलिट, काँग्रेसच्या बड्या नेत्याचा फडणवीसांना जबरी टोला

Nagpur Graduate Constituency Election Result 2026: नागपूर पदवीधर मतदारसंघात मुख्यमंत्री, महसूलमंत्री आणि केंद्रीय मंत्री उतरले असतानाही भाजपचा पराभवा झाल्यानंतर काँग्रेसने आता मोहिम उघडली आहे. काँग्रेस नेत्यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. तर फडणवीसांवर अचूक निशाणा साधला आहे.

कितीही सरवासारव केली तरी... नागपूर पदवीधरमधील पराभवानंतर ट्वीटही डिलिट, काँग्रेसच्या बड्या नेत्याचा फडणवीसांना जबरी टोला
कितीही सरवासारव केली तरी... काँग्रेसच्या बड्या नेत्याचा फडणवीसांना जबरी टोला
| Updated on: Oct 29, 2026 | 9:34 AM

Nana Patole on Devendra Fadnavis: नागपूर पदवीधर मतदारसंघातील अनपेक्षित निकालाने भाजप सैरभैर झाली आहे. भाजप आता त्यासाठी शिंदे शिवसेनेसह इतर घटकांना कारणीभूत ठरत आहे. विजयाचं श्रेय घेण्यासाठी सर्वच सरसावतात. पण पराभवाचं खापर कुणावर तरी फोडणं महत्त्वाचं असतं. ते काम आता सुरू झाले आहे. भाजपच्या पराभवाची चर्चा सुरू असतानाच काँग्रेस आक्रमक झाली आहे. काँग्रेस नेत्यांनी आणि महाविकास आघाडीतील नेत्यांनी भाजपवर सडकून टीका केली. तर दुसरीकडे होमग्राऊंडवर अपयश आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही काँग्रेसकडून हल्लाबोल करण्यात आला आहे.

अभिजीत वंजारी यांनी मारली बाजी

Loading...

सुधाकर कोहळे यांच्यासाठी भाजपने सर्व यंत्रणा पणाला लावली. मुख्यमंत्र्यांच्याच होम टाऊनमधील निवडणूक असल्याने ती प्रतिष्ठेची झाली होती. काँग्रेसचा सहज पराभव होईल असा एकंदरीत सूर होता. पण वारं फिरलं आणि आकड्यांनी घात केला. दुसऱ्या पसंतीच्या मतांनी भाजपला धूळ चारली. अभिजीत वंजारी यांनी या मतांच्या बेरजेवर गणित साधलं. सुधाकर कोहळे दुसऱ्या स्थानावर फेकल्या गेले. तर किंगमेकर अपक्ष उमेदवार नितेश कराळे मास्तरांनी भीमपराक्रम गाजवला. त्यांनी 25,000 मतं खेचून आणली. त्यांच्या मतपत्रिकेतील दुसऱ्या क्रमांकाच्या मतांनी वंजारी यांचा विजय सुकर झाला.

मोदींचे ते ट्विट फडणवीसांनी रिट्वीट करून केले डिलिट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील 28 विधान परिषद निवडणुकीचा दाखला देत काँग्रेसला उपरोधिक टोला हाणला. 28 शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात बॅलेट पेपरचा, मतपत्रिकेचा वापर झाला. इथं ईव्हीएम नव्हते. अशावेळी काँग्रेसला किती जागा जिंकता आल्या असा सवाल मोदींनी केला. हे ट्विट आज अनेक भाजप नेत्यांनी रिट्वीट केले. तोच धागा पकडत फडणवीसांनी सुद्धा ते ट्विट रिट्विट केले. पण नंतर त्यांनी ते डिलिटही केले. त्यावरून आता काँग्रेसने त्यांचा तिखट समाचार घेतला.

कितीही सारवासारव केली, तरी…

काँग्रेस नेते आमदार नाना पटोले यांची एक्स वर पोस्ट केली आहे. सगळ्या यंत्रणा उध्वस्त करून नागपूर पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचा झेंडा फडकला. नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून काँग्रेस-महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अभिजित गोविंदराव वंजारी विजयी झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्राच्या निकालासंदर्भात अतिघाईने केलेले ट्विट डिलीट करण्याची नामुष्की त्यांच्यावर आली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी कितीही सारवासारव केली, तरी ट्विट डिलीट करावेच लागेल. संघाच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचा झेंडा नेहमी फडकत राहील, असा टोला नाना पटोले यांनी लगावला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us