Nana Patole: जो गट मोठा असेल त्याच्याकेड ‘हे’ पद जाणार; सभागृहाचा विषय न्यायालयात गेला; नाना पटोले म्हणतात विरोधी पक्ष नेते पदावर आता काय ते आता ठरणार

| Updated on: Jul 03, 2022 | 3:04 PM

व्हीप विरोधात मविआचे मतदान झाले असून आता याबाबत सर्वोच्च न्यायालय काय निर्णय काय देणार त्यानंतर आमची भूमिका ठरणार असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.

Nana Patole: जो गट मोठा असेल त्याच्याकेड हे पद जाणार; सभागृहाचा विषय न्यायालयात गेला; नाना पटोले म्हणतात विरोधी पक्ष नेते पदावर आता काय ते आता ठरणार
Follow us on

मुंबईः एकनाथ शिंदे यांची नाट्यमय घडामोडीनंतर मुख्यमंत्री पदी निवड झाल्यानंतर आज भाजपच्या राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली. मुख्यमंत्री, विधानसभेच्या निवडीनंतर आता विरोधी बाकावर असणारे मविआचे घटक पक्ष त्यामध्ये शि वसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या निवडीबद्दल अभिनंदन केले असले तरी व्हीप मतदानाचा विषय आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. व्हीप मतदानाविषयी काँग्रेसचे आमदार नाना पटोले (Nana Patole) यांनी आपण व्हीपच्या विरोधात आमचं मतदान (Voting against whip) झालं असल्याचे त्यांनी सांगितले.

व्हीप विरोधात मविआचे मतदान झाले असून आता याबाबत सर्वोच्च न्यायालय काय निर्णय काय देणार त्यानंतर आमची भूमिका ठरणार असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.

सभागृहाचा विषय न्यायालयात

शिवसेनेच्या ज्या ज्या आमदारांनी बंडखोरी केली त्यानंतर राज्यातील राजकीय परिस्थिती ढवळून निघाली. त्यानंतर काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी जे सभागृहाचे विषय होते, विधानसभा अध्यक्षांचा विषयही हा न्यायालयात गेला आहे. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालय याबाबत निर्णय काय देणार त्याच्यावर आमचा निर्णय ठरणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

जो गट मोठा असेल त्याच्याकडे विरोधी पक्ष नेते पद

आमदार नाना पटोले यांनी विरोधी पक्ष नेते पदाविषयी विचारले असता त्यांनी यावेळी सांगितले की, जो गट मोठा असेल, ठरेल त्यावरच विरोधी पक्ष नेते पद जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे विरोधी पक्ष नेते पद राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यताही वर्तवण्यात आली.

 आमचे मतदान व्हीपच्या विरोधात

नाना पटोले यांनी आपली भूमिका मांडताना व्हीपच्या विरोधात आमचे मतदान झाले असून विधानसभा अध्यक्षांचा विषय सर्वोच्च न्यायालयात गेला असल्याने आता न्यायालयाच्या निकालावर आमचा निर्णय ठरणार असल्याचेही त्यांनी सांगितले.