Maharashtra Assembly Session: जावई म्हणून आमच्याकडे लक्ष द्या, नाही तर मुलीला सांगून समाचार घेऊ; जयंत पाटलांच्या विधानाने खसखस

Maharashtra Assembly Session: जयंत पाटील हे विधानसभेत बोलत होते. जावई हे सासऱ्याच्या कुंडलीतील दशम स्थान आहे. आता कुंडल्या वगैरे... आपण आधुनिक काळात आहोत. ज्योतिष वगैरे बाजूला ठेवून... आधुनिक काळात कुंडलीतील दशम स्थान कसे खोटं आहे हे दाखवण्यासाठी देवेंद्र फडणवीसजी आपल्याला संधी आहे.

Maharashtra Assembly Session: जावई म्हणून आमच्याकडे लक्ष द्या, नाही तर मुलीला सांगून समाचार घेऊ; जयंत पाटलांच्या विधानाने खसखस
जावई म्हणून आमच्याकडे लक्ष द्या, नाही तर मुलीला सांगून समाचार घेऊ; जयंत पाटलांच्या विधानाने खसखस
Image Credit source: tv9 marathi
भीमराव गवळी

|

Jul 03, 2022 | 1:52 PM

मुंबई: तुम्ही जावई आहात. आमचे जावई आहात. त्यामुळे आमच्याकडे बघतानाचा दृष्टीकोण चांगला असेल अशी आमची खात्री आहे. नसेल तर संध्याकाळी घरी आमच्या मुलीला कळवू. आज यांनी काय काय केले ते सगळं सांगू. मग संध्याकाळी तुमचा समाचार घेण्याची व्यवस्था आम्ही करू, अशी कोटी राष्ट्रवादीचे (ncp) आमदार जयंत पाटील (jayant patil) यांनी करताच एकच खसखस पिकली. विधानसभेत नवनिर्वाचित विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (rahul narvekar) यांच्या अभिनंदनाच्या ठरावावर बोलताना त्यांनी ही कोटी केली. तसेच विधानसभेत प्रत्येक सदस्याला बोलण्याची संधी मिळाली पाहिजे. कुणाचाही वेळ खाता कामा नये. अनेकदा तर अनेकांचं भाषण आडवलं जातं. प्रत्येकाचं भाषण अडवलंच पाहिजे असं करू नका. कारण नव्या सदस्यांना आपलं मत मांडायला संधी हवी असते. ती संधी त्यांना मिळायला हवी, त्या दृष्टीने आपण काही कराल ही अपेक्षा आहे, अशी अपेक्षा जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

जयंत पाटील हे विधानसभेत बोलत होते. जावई हे सासऱ्याच्या कुंडलीतील दशम स्थान आहे. आता कुंडल्या वगैरे… आपण आधुनिक काळात आहोत. ज्योतिष वगैरे बाजूला ठेवून… आधुनिक काळात कुंडलीतील दशम स्थान कसे खोटं आहे हे दाखवण्यासाठी देवेंद्र फडणवीसजी आपल्याला संधी आहे. खाली जावई आणि वर सासरे आहे. या दोघांची किमान एक वर्ष स्थान कायम ठेवण्याचं काम आपण करू शकता. फक्त कुंडली खोटी ठरवण्यासाठी कुंडलीचा अभ्यास करणारे जे आहेत, अंधश्रद्धाळू जे आहेत, त्यांची अंधश्रद्धा दूर ठेवण्यासाठी एक वर्षाचा काळ प्रयोग करू, असं जयंत पाटील म्हणाले.

सासऱ्याच्या पत्रिकेतील दशमग्रह

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नव्या अध्यक्षांचं अभिनंदन केलं. राहुल नार्वेकर देशातील तरुण विधानसभा अध्यक्ष आहेत. विधानसभा अध्यक्षांची भूमिका एका न्यायमूर्तीसारखी आहे. हे कठीण काम आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. कायदेमंडळाला कायद्यात निष्णात असलेले अध्यक्ष मिळाले आहेत. याआधीच्या अध्यक्षांनीही उत्तम काम केलेलं आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. वरच्या सभागृहाचे सभापती आणि खालचे अध्यक्ष, हे नातं सासरे आणि जावयाचं आहे. हा एक योगायोग आहे. पण पु. ल. देशपांडे म्हणतात, जावई आणि सासऱ्याचं एकमत होणं कठीण आहे. जावयाचा उल्लेख असा करतात, की जावई म्हणजे सासऱ्याच्या पत्रिकेतला दशम ग्रह आहे. पण असं नाहीये. राहुल नार्वेकर यांचं प्रेम आहे सासऱ्यावर, असंही फडणवीस म्हणाले.

हे सुद्धा वाचा

नार्वेकरांचं वाजन खरोखरच वाढलंय

यावेळी शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनीही आपलं भाषण केलं. सगळ्या अर्थांनी राहुल नार्वेकर यांचं वजन वाढलंय, असा चिमटा आदित्य ठाकरे यांनी काढला. आता कुलाब्याच्या घरी चालत जाऊ नका, नाहीतर मनावर घ्याल. आता बच्चन साहेबांच्या भाषेत सांगायचं तर परंपरा, प्रतिष्ठा आणि अनुशासन यांचं पालन तुम्ही कराल,अशी आशा बाळगतो, असं आदित्य ठाकरेंनी राहुल नार्वेकरांबाबत बोलताना म्हटलंय. राजकारणाची पातळी खूप खाली चाललीये, हे तरुणांना न पटणारं आहे, असंही ते म्हणाले.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें