Narayan Rane : कुणाच्या सोबत जा, पूर आल्यावर… राज-उद्धव एकत्र येण्याच्या चर्चांवर नारायण राणे यांचा खरमरीत टोला

Raj -Uddhav Thackeray Alliance : राज्यात सध्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची चर्चा जोरात आहे. मुंबई महापालिकाच नाही तर आगामी निवडणुकीसाठी हा फॉर्म्युला हिट ठरण्याचा दावा करण्यात येत आहे. त्यातच नारायण राणे यांनी मात्र या चर्चांवर चांगलेच तोंडसुख घेतले आहे.

Narayan Rane : कुणाच्या सोबत जा, पूर आल्यावर... राज-उद्धव एकत्र येण्याच्या चर्चांवर नारायण राणे यांचा खरमरीत टोला
राज उद्धव ठाकरे युती, नारायण राणेंची टीका
Image Credit source: गुगल
| Updated on: May 27, 2025 | 4:30 PM

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजत असतानाच राज्यात उद्धव ठाकरे गटाने राज ठाकरे यांना मनसे साद घातली आहे. राज ठाकरे यांनी एका कार्यक्रमात दिलजमाईची बात ठेवली होती. त्यानंतर एक महिन्यापासून केवळ चर्चा सुरू आहे. दोन्ही बाजूंनी साद घातल्या गेली. प्रतिसाद पण देण्यात आला. पण गाडं कुठं आडलंय ते समोर आलेले नाही. त्यातच भाजपचे नेते नारायण राणे यांनी पत्र परिषद घेत या संभाव्य युतीवर चांगलेच तोंडसुख घेतले.

सध्या भाजपाचा पूर आलाय

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार या चर्चांवर नारायण राणे यांनी जोरदार टीका केली आहे. ठकुणाच्या सोबत जा. पूर आल्यावर पुराच्या पाण्याबरोबर सर्व वाहून जातात. भाजपचा पूर आलाय. त्यात हे टिकणार नाहीत. आणि पूर हा जाचक नाहीये, लोकांना त्रास होणार नाही. उलट फायदाच होईल. सत्ता आमची दोन्हीकडे आहे. सर्व सामान्यांसाठी केंद्र आणि राज्य सरकार चांगलं काम करत आहेत. हे निवडणुकीत काय सांगणार? २६ वर्षाच्या भ्रष्टाचारावर बोलणार की कोरोना काळातील भ्रष्टाचारावर बोलणार.” असा खडा सवाल त्यांनी केला.

काही चमत्कार होणार नाही

यावेळी त्यांनी हे दोन्ही भाऊ एकत्र आले तरी काही चमत्कार होणार नसल्याचा दावा केला. काय होणार चमत्कार? अशी काय जादू आहे का यांच्याकडे. एकत्र आले म्हणून वीज चमकणार आणि झालं सर्व. अरे काय आहे त्यांच्याकडे. दोघांचा हिशोब करा ना. मराठी माणसाचं काय कल्याण केलं. शिवसेना ही मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी झाले. आज १६ टक्के मराठी मुंबईत आहेत. पूर्वी ६० टक्के होते. आज १८ ते १९ टक्के आहेत. काय केलं शिवसेनेने. हिंदू हिंदू. आता सावरकर सावरकर. मुख्यमंत्री होता, तेव्हा राहुल गांधींच्या मांडीला मांडी लावून बसायचे. तेव्हा राहुल गांधी सावरकरांवर टीका करायचे. तेव्हा काही बोलला नाही. आता उद्धव ठाकरे सावरकर सावरकर करत आहेत, अशी टीका राणेंनी केली.

दोघांना बॉर्डरवर पाठवा

राज आणि उद्धव हा जर फॉर्म्युला असेल तर त्यांना पाकिस्तान बॉर्डरवर पाठवा. दोन्ही भाऊ एकत्र आले तर विजय विजय मिळेल. काय समीकरण माहीत नाही. दोन्ही भावांची ताकद काय आहे. एकाकडे शून्य आमदार. तर दुसर्‍याकडे 20 आमदार. करा प्लस. किती होतात पाहा. फरक नाही पडणार. ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी चालणार नाही, असा घणाघात राणे यांनी घातला.